शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नागपुरातही चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नागपुरातही आंदोलन करण्यात आले. इंदोरा चौकातही मोठ्या प्रमाणावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नागपुरातही आंदोलन करण्यात आले. इंदोरा चौकातही मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. कामठी रोड जाम झाल्याने वाहतूक वळवण्यात आली.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ दुपारी २ वाजेपासून इंदोरा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून या रस्त्यावरील वाहतुकी वळविण्यात आली होती. कामठी रोड व ऑटोमोटिव्ह चौकाकडून येणारी वाहने ही थेट इंदोरा चौकाकडे न येता, ती ग्रामीण पोलीस मुख्यालयामार्गे वळविण्यात आली.

संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार संविधान चौकातही विविध संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांवर पोलीस अत्याचार बंद करा, किसानविरोधी शेतकरी कायदे वापस घ्या तसेच शेतीमध्ये सरकारी गुंतवणूक वाढवा व शेती उद्योगपतींच्या हवाली करणे बंद करा, या मागण्या प्रदर्शनाद्वारे करण्यात आल्या.

आंदोलनात अरुण लाटकर, मनोहर मुळे, रामेश्वर चरपे, मधुकर भरणे, मोहम्मद ताजुद्दीन, दिलीप देशपांडे, विलास जांभूळकर, सुभाष रामटेके, विजया जांभूळकर, स्नेहलता जांभूळकर, वैशाली केडिया, ॲड. विजय फुलकर यांच्यासह विविध संघटना व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.