शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण संचालक नियुक्ती प्रक्रियेला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:02 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक नियुक्ती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या पदासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या अर्जदार डॉ. वंदना इंगळे यांनी रिट याचिकेद्वारे हे आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : नियुक्ती प्रक्रिया राहील प्रकरणावरील निर्णयाधीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक नियुक्ती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या पदासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या अर्जदार डॉ. वंदना इंगळे यांनी रिट याचिकेद्वारे हे आव्हान दिले आहे.याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू, पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. जी. एस. खेडकर, सचिव प्रदीप बिन्नीवाले व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून याचिकेवर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, वादग्रस्त नियुक्ती प्रक्रिया याचिकेवरील निर्णयाधीन राहील असे स्पष्ट केले.नागपूर विद्यापीठाने या पदासाठी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. त्यानुसार इंगळे यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, पात्रता व अनुभवाच्या निकषात बसत नसल्याच्या कारणावरून त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. तो निर्णय चुकीचा असल्याचे इंगळे यांचे म्हणणे आहे. अर्ज फेटाळताना रेकॉर्डवरील पुरावे योग्य पद्धतीने विचारात घेण्यात आले नाही. पडताळणी समितीने वाईट हेतूने अर्ज फेटाळला. यासंदर्भात निवेदने सादर केली असता, त्याची दखल घेण्यात आली नाही असा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. डॉ. माधवी मार्डीकर व डॉ. शरद सूर्यवंशी यांना या पदासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. खरे पाहता ते दोघेही अपात्र आहेत असेदेखील इंगळे यांनी नमूद केले आहे. नियुक्ती प्रक्रि येचा संपूर्ण रेकॉर्ड मागविण्यात यावा व नवीन पडताळणी समिती स्थापन करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. इंगळे यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ