शहरं
Join us  
Trending Stories
1
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
2
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
3
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
4
पाकिस्तानात 8 वर्षांनंतर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; पॅसेंजर वाहनावर ओपन फायरिंग, 39 जणांचा मृत्यू
5
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
6
अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज
7
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
8
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
9
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
10
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा
11
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
12
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
13
Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीला 'हे' तोडगे करा आणि संसार तापातून मुक्त व्हा!
14
'धूम २'मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने हृतिक रोशनसोबत दिला होता किसिंग सीन, याबद्दल अभिनेत्री म्हणाली....
15
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
16
Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?
17
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
18
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."
19
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
20
'खलनायक'मधील साँगसह Yashasvi Jaiswal साठी आला टीम इंडियासाठी 'नायक' होण्याचा संदेश

विमानतळ विकास कंत्राट रद्दला आव्हान : जीएमआरची हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 9:02 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार कामाचे कंत्राट अचानक रद्द करण्यात आल्यामुळे जीएमआर एअरपोर्ट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी नागरी उड्डयन मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, मिहान इंडिया कंपनी, राज्य सरकार व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांना नोटीस बजावून १२ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देउत्तर सादर करण्याचा सरकारला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार कामाचे कंत्राट अचानक रद्द करण्यात आल्यामुळे जीएमआर एअरपोर्ट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी नागरी उड्डयन मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, मिहान इंडिया कंपनी, राज्य सरकार व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांना नोटीस बजावून १२ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. तसेच, यासंदर्भात नवीन निविदा आमंत्रित करण्यात आल्यास त्या निविदा सदर याचिकेवरील निर्णयाधीन राहतील असे स्पष्ट केले.याचिकेवर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्य सरकारने नागपूर विमानतळाचा विकास करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यात सुमारे १३ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी जीएमआर कंपनीसह अन्य चार कंपन्यांची तांत्रिक बोलीसाठी निवड करण्यात आली होती. विमानतळाचा आराखडा, विकास योजना, प्रवासी वाहतूक मर्यादा, विमानतळातून होणारे व्यावसायिक उत्पन्न, राज्य सरकारला द्यावयाचा आर्थिक वाटा इत्यादी मुद्यांच्या आधारावर जीएमआर कंपनीची या कंत्राटाकरिता निवड करण्यात आली होती. त्यानंतर जीएमआरने भागीदार कंपनी निवडली होती. तसेच, काम सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारसोबत वारंवार पत्रव्यवहार केला होता. परंतु, १६ मार्च २०२० रोजी राज्य सरकारने हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अवैध असल्याचे जीएमआर कंपनीचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ वकील जुगलकिशोर गिल्डा व अ‍ॅड. चारुहास धर्माधिकारी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर