लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कचे व्यावसायिकरण करण्याविरुद्ध सिव्हीक अॅक्शन गिल्ड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याचिकेत महानगरपालिका आयुक्तांना प्रतिवादी करण्यात आले आहे.चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी १० जुलै २०२० रोजी टेंडर नोटीस जारी करण्यात आली आहे. टेंडर सादर करण्याची अंतिम तारीख ४ ऑगस्ट आहे तर, ६ ऑगस्ट रोजी टेंडर उघडले जाणार आहे. कंत्राटाची मुदत पाच वर्षे राहणार आहे. दरम्यान, या पार्कचा खाणे-पिणे, लग्न समारंभ, मेळावे इत्यासाठी उपयोग केला जाईल. परिणामी, पार्कच्या मूळ उद्देशाची पायमल्ली होईल. मुलांना वाहतूक नियमांचे शिक्षण देण्याकरिता या पार्कचा विकास करण्यात आला होता. तो उद्देश मागे पडून हे पार्क केवळ व्यावसायिक करमणुकीचे केंद्र झाले आहे. तसेच, पार्कमध्ये असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. ते पार्कमध्ये दारू पितात. प्रेमीयुगुल अश्लील चाळे करतात. सफाई केल्यानंतर प्रत्येकवेळी दारूच्या बॉटल्स व इतर आक्षेपार्ह वस्तू आढळून येतात. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या, पण काहीच कारवाई करण्यात आली नाही. हे पार्क मुलांना खेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी सुरक्षित ठिकाण आहे. खासगी ऑपरेटर नियुक्त केल्यास पार्कचे व्यावसायिकरण होईल. त्यामुळे वादग्रस्त टेंडर नोटीस रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. तुषार मंडलेकर कामकाज पाहतील.
चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या व्यावसायिकरणला आव्हान : हायकोर्टात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 9:34 PM
धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कचे व्यावसायिकरण करण्याविरुद्ध सिव्हीक अॅक्शन गिल्ड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याचिकेत महानगरपालिका आयुक्तांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
ठळक मुद्देटेंडर नोटीस रद्द करण्याची मागणी