शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मेट्रो रेल्वेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

By admin | Published: October 19, 2016 3:07 AM

मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन, उत्पादन, पुरवठा, तपासणी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासंदर्भातील निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी भारत अर्थ मुव्हर्स कंपनीची

तांत्रिक बोली अपात्र ठरविली : भारत अर्थ मुव्हर्स कंपनीची याचिकानागपूर : मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन, उत्पादन, पुरवठा, तपासणी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासंदर्भातील निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी भारत अर्थ मुव्हर्स कंपनीची तांत्रिक बोली नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने अपात्र ठरविली आहे. या निर्णयाविरुद्ध कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लुर व न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, या प्रकरणात चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशनला प्रतिवादी करण्यास सांगितले. मेट्रो कॉर्पोरेशनने चायना रेल्वेची निविदा मंजूर केली आहे. मेट्रो कॉर्पोरेशनने २५ जानेवारी रोजी नोटीस जारी करून मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे उत्पादन व इतर बाबींसाठी निविदा आमंत्रित केल्या होत्या. निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपनीला मेट्रो रेल्वेच्या डब्यांचे डिझाईन व उत्पादनाचा १० वर्षांचा अनुभव आवश्यक होता. याशिवायही विविध पात्रता निकष होते. कॉर्पोरेशनने २९ सप्टेंबर रोजी भारत कंपनीला ई-मेल पाठवून त्यांची तांत्रिक बोली अपात्र ठरविण्यात आल्याचे कळविले. हा निर्णय रद्द करून तांत्रिक बोलीचा पुनर्विचार करण्यात यावा, आर्थिक बोली उघडण्यात यावी व निविदा वाटप करण्यास मनाई करण्यात यावी अशी विनंती कंपनीने न्यायालयाला केली आहे.(प्रतिनिधी)