शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

जात प्रमाणपत्र कायद्यातील तरतुदीला हायकोर्टात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 11:49 AM

Nagpur News जात प्रमाणपत्र कायद्यातील कलम ६ मधील तरतूद आणि जात प्रमाणपत्र नियमातील ९ व्या नियमाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहाधिवक्त्यांना नोटीसयाचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जात प्रमाणपत्र कायद्यातील कलम ६ मधील तरतूद आणि जात प्रमाणपत्र नियमातील ९ व्या नियमाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी बुधवारी महाधिवक्त्यांना नोटीस बजावली व सदर याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली.

विजय धकाते असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते आरमोरी, जि. गडचिरोली येथील रहिवासी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने १९९५ मध्ये माधुरी पाटील प्रकरणात दिलेल्या निर्णयात, जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी समितीचे अध्यक्ष अतिरिक्त सचिव व सहसचिव श्रेणीतील तर, संशोधन अधिकारी समाजशास्त्र किंवा मानववंशशास्त्र विषयामध्ये एम.ए. पदवीधारक असावे, असे म्हटले आहे. परंतु, राज्यात जात प्रमाणपत्र कायदा व नियम लागू करताना या बंधनकारक निर्देशांचे पालन करण्यात आले नाही. परिणामी, वादग्रस्त कलम ६ मधील तरतूद व नियम ९ अवैध ठरवून रद्द करणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी कामकाज पाहिले.

समान याचिका होतील एकत्र

या कायद्यातील अन्य विविध तरतुदींना आव्हान देणाऱ्या काही याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. अशा सर्व समान याचिका एकत्र करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय