शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

रेती घाट ऑनलाईन सुनावणीच्या वैधतेला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:59 AM

रेती घाटांना पर्यावरणविषयक परवानगी देण्याकरिता ऑनलाईन सार्वजनिक सुनावणी आदेशाविरुद्ध पर्यावरणतज्ज्ञ सुधीर पालीवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देमूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेती घाटांना पर्यावरणविषयक परवानगी देण्याकरिता ऑनलाईन सार्वजनिक सुनावणी घेण्याच्या आदेशाविरुद्ध पर्यावरणतज्ज्ञ सुधीर पालीवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. राज्यातील बहुसंख्य नागरिकांना तंत्रज्ञान अवगत नाही. त्यांच्याकडे ऑनलाईन सुनावणीत सहभागी होण्यासाठी आवश्यक सुविधा नाही. त्यामुळे हा आदेश नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.कोरोना नियंत्रणाकरिता देशभरात लॉकडाऊन लागू असल्यामुळे रेती घाटांना पर्यावरणविषयक परवानगी देण्याकरिता झूम अ‍ॅप किंवा अन्य माध्यमातून ऑनलाईन सार्वजनिक सुनावणी घेण्यात यावी, असा आदेश महसूल व वन विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी २७ एप्रिल रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार राज्यभरात सार्वजनिक सुनावणी घेतल्या जात आहेत.

ऑनलाईन सुनावणी याचिकेवरील निर्णयाधीनयाचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, पर्यावरण विभागाचे सचिव, महसूल व वन विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांना नोटीस बजावून ३० जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले तसेच ऑनलाईन सार्वजनिक सुनावणी याचिकेवरील निर्णयाधीन राहील, असा अंतरिम आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय