शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मोदींपुढील आव्हाने व संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:11 AM

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशिवाय सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे भारतीय जनता पक्षाचे दुसरेच नेते ...

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशिवाय सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे भारतीय जनता पक्षाचे दुसरेच नेते आणि सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करणारे पहिले गैरकाँग्रेसी नेते, असे भारतीय राजकारणात अनेक मैलाचे दगड रोवणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी एकाहत्तरावा जन्मदिन साजरा करत आहेत. कालच जगप्रसिद्ध ‘टाईम’ मासिकाने जगभरातील शंभर प्रभावी व्यक्तींची यंदाची यादी जाहीर केली आणि अपेक्षेनुसार त्यात नरेंद्र मोदी यांचे नाव आहेच. या व अशा अन्य मंचावरील त्यांच्या नावाच्या समावेशाचे आता अप्रुप वाटू नये, इतके ते आता देशवासियांसाठी सवयीचे बनले आहे. अनेक कारणांनी यंदाचा मोदींचा वाढदिवस वेगळा व महत्त्वाचा आहे. पुढील ऑक्टोबरमध्ये मोदींच्या राजकीय कारकीर्दीला वीस वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नंतर भाजपच्या संघटनफळीत काम केल्यानंतर प्रत्यक्ष राजकारणात येताना त्यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून चारवेळा शपथ व नंतर देशाचे सर्वोच्च नेते ही त्यांची कारकीर्द आणि दुसऱ्या पंचवार्षिकातील उरलेल्या तीन वर्षांमध्ये त्यांच्या सरकारपुढील आव्हाने यांचा आढावा घ्यायला हवा. तो घेताना अर्थातच कोरोना महामारीचे संकट केंदस्थानी असेल. विषाणू संक्रमणाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले. ऑक्सिजन तुटवड्यामुळे गेलेले जीव, गंगा नदीत वाहून जाणारी प्रेते हे चित्र विषण्ण करणारे होते. विषाणूच्या फैलावासोबतच सर्वच पातळ्यांवर आर्थिक संकट कोसळले, अनेकांची रोजीरोटी हिरावली गेली. तेव्हा सामान्यांना मदतीसाठी सरकारने अनेक पावले उचलली. कोरोना प्रतिबंधक लसीच्या वितरणाची प्रारंभी डगमगलेली व्यवस्था आता योग्य मार्गावर आली आहे. ढासळणारी अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणण्यात सरकारचा खूप वेळ गेला. आता तिसऱ्या लाटेची शक्यता धुसर होत असताना देशाची आर्थिक गाडी रूळावर येत असल्याची सुचिन्हे आहेत. औद्योगिक उत्पादन वाढू लागले आहे, बाजारपेठेतील चलनवलन वाढते आहे. तथापि, दुसऱ्या बाजूला गेले जवळपास वर्षभर उत्तर भारतातील शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात ठिय्या देऊन बसले आहेत. एकूणच हा कालखंड नरेंद्र मोदी यांच्या प्रशासकीय काैशल्याचा कस पाहणारा आहे, हे खरे. दुसऱ्या बाजूला मोदी यांच्यापुढे राजकीय आव्हानेही आहेत. गेल्या मे महिन्यात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्याचा आधार घेऊन विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात या भाजपशासित राज्यांमधील मुख्यमंत्री बदलावे लागले. आसाम विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदी हेमंत बिस्वा शर्मा यांच्या रूपाने नवा चेहरा द्यावा लागला. येत्या वर्षभरात मोदींचे गृहराज्य गुजरात तसेच देशात सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे उत्तर प्रदेश अशा काही राज्यांच्या निवडणुका होत आहेत; त्या जिंकणे मोदींसाठी खूप गरजेचे आहे. या प्रशासकीय व राजकीय आव्हानांशिवाय नरेंद्र मोदी यांचा करिश्माई नेते म्हणून विचार करायला हवा. लहान मुले, तरूण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांमध्ये नरेंद्र मोदींइतके लोकप्रिय सध्या भारतात कोणीही नाही. एकविसाव्या शतकातील प्रभावी व लोकप्रिय जागतिक नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. त्यांनी भारतीयांना, विशेषत: युवावर्गाला स्वप्ने पाहायला शिकवले. पाच ट्रिलियन इकाॅनाॅमीसारखे स्वप्न त्यांनी देशाला दाखवले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवताना भाजपने पहिल्यांदा सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आणि भारतीय राजकारणात प्रचाराच्या माध्यमाचे एक नवे पर्व सुरू झाले. सुरुवातीला या माध्यमांबद्दल नाके मुरडणाऱ्या अन्य सगळ्याच राजकीय पक्षांनी नंतर तोच मार्ग स्वीकारला. तथापि, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या नवमाध्यमांचा वापर कमी केला आणि कार्यकर्त्यांच्या फळीवर अधिक भिस्त ठेवली. हा बदल निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच राजकीय पंडितांच्या लक्षात आला. ज्या राज्यांमध्ये भाजपचे नेटवर्क आहे; त्याच भागातून भाजपला पुन्हा चांगले यश मिळण्यामागे तेव्हाचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांची ही रणनीती फायद्याची ठरली. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हा उत्सव साजरा करताना नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या अनेक योजना देशाला नवी दिशा देणाऱ्या ठरतील. त्यासाठी जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा!

———————————-