नागपूर महापालिकेच्या स्ट्रीट एलईडी लॅम्पस् खरेदीला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:23 AM2018-06-22T01:23:16+5:302018-06-22T01:23:16+5:30

महापालिकेच्या स्ट्रीट एलईडी लॅम्पस् खरेदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या व्यवहारात १०० कोटीवर रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Challenging the purchase of the Nagpur City's street LED lamps | नागपूर महापालिकेच्या स्ट्रीट एलईडी लॅम्पस् खरेदीला आव्हान

नागपूर महापालिकेच्या स्ट्रीट एलईडी लॅम्पस् खरेदीला आव्हान

Next
ठळक मुद्देहायकोर्टात जनहित याचिका : १०० कोटी रुपयांवर गैरव्यवहाराचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : महापालिकेच्या स्ट्रीट एलईडी लॅम्पस् खरेदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या व्यवहारात १०० कोटीवर रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अ‍ॅड. अभियान बाराहाते यांनी एका वर्तमानपत्रातील बातमीच्या आधारावर यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. नगरसेवक संदीप सहारे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मिळविलेल्या माहितीवरून ती बातमी प्रकाशित झाली आहे. याचिकाकर्त्याने ती माहिती तपासून पाहिली असता त्यात तथ्य असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. महापालिकेचे अधिकारी खासगी कंपन्यांसोबत मिळून सार्वजनिक निधीची दिवसाढवळ्या लूट करीत आहेत. बाजारात अवघ्या ३४०० रुपये नगाप्रमाणे उपलब्ध होऊ शकणारे स्ट्रीट एलईडी लॅम्पस् महापालिकेने चक्क ९९०० रुपये दराने खरेदी करण्याचा करार केला आहे. असे १ लाख ३८ हजार स्ट्रीट एलईडी लॅम्पस् खरेदी केले जाणार असल्यामुळे हा तब्बल १०० कोटीवर रुपयांचा उच्चस्तरीय भ्रष्टाचार असल्याचे दिसून येते असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
या खरेदी व्यवहाराचा संपूर्ण रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यात यावा, मनपा खरेदी करणार असलेले एलईडी लॅम्पस् व बाजारात उपलब्ध असलेले एलईडी लॅम्पस् यांची गुणवत्ता व किमतीची तज्ज्ञांमार्फत तुलना करून अहवाल मागविण्यात यावा, मनपास एलईडी लॅम्पस् पुरविणाऱ्या कंपनीला बिल अदा करण्यास मनाई करण्यात यावी व या गैरव्यवहारात सामील व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेत महापालिका आयुक्त, महापौर, खरेदी समिती अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष, वीज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल व नगरसेवक संदीप सहारे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे बाजू मांडतील.

Web Title: Challenging the purchase of the Nagpur City's street LED lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.