लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा पावसाने साथ सोडलेलीच नाही. अधेमधे ढग दाटून येतात, जोराचा वारा सुटतो आणि क्षणभर का होईना पावसाचा मारा पडतो. २४ मार्च रोजी विदर्भात पुन्हा एकदा अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूंच्या संक्रमणकाळात वातावरणातील ही अनिश्चितता चिंतेचे कारण ठरत आहे.दोन दिवसापासून ढगाळ वातावरणासोबतच उन्हाचे चटके बसत आहेत. शुक्रवारी सकाळी आकाशात ढगांचा राबता होता तर दुपारी निरभ्र आकाशामुळे तीव्र उन होते. अधेमधे ढगाळ वातावरण होतो. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. उन जेवढे पडेल तेवढाच विषाणूंचा प्रकोप कमी असेल, अशी नागरिकांची धारणा आहे. त्यामुळे, पाऊस पडू नये अशी प्रार्थना नागरिक निसर्गाकडे करत आहेत. मात्र, निसर्ग काहीएक ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाकडून शुक्रवारी नागपूर सोबतच गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गोंदियामध्ये सकाळी ८.३० वाजतापर्यंत ४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागपुरातही पावसाचे सावट आहेच.शुक्रवारी कमाल व किमान तापमानात दोन अंशा डिग्री सेल्सिअसची नोंद झाली. शुक्रवारी कमाल तापमान ३५.२ तर किमान तापमान १८.६ अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ मार्च रोजी पुन्हा एकदा विदर्भातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे. अशी स्थिती असतानाच ब्रह्मपुरी व अकोला येथे कमाल तापमान ३७.५ अंश डिग्री सेल्सिअससपर्यंत पोहोचले आहे. वाशिममध्ये ३७ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे तर गोंदियाचे किमान तापमान १६.५ अंश डिग्री इतके नोंदविले गेले.
२४ मार्चला विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 10:44 AM