शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
5
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
6
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
7
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
8
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
9
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
10
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
11
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
13
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
14
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
15
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
18
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
19
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
20
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

हायकोर्टाच्या रोस्टरमध्ये बदल

By admin | Published: December 26, 2014 12:49 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या रोस्टरमध्ये नियमित प्रक्रियेनुसार बदल करण्यात आला आहे. नागपूर खंडपीठात यापुढे नवीन आदेशापर्यंत चार युगलपीठे कार्य करणार आहेत. नवीन रोस्टर ५ जानेवारीपासून लागू होईल.

नागपुरात चार युगलपीठे : ५ जानेवारीपासून अंमलबजावणीनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या रोस्टरमध्ये नियमित प्रक्रियेनुसार बदल करण्यात आला आहे. नागपूर खंडपीठात यापुढे नवीन आदेशापर्यंत चार युगलपीठे कार्य करणार आहेत. नवीन रोस्टर ५ जानेवारीपासून लागू होईल.नवीन रोस्टरमध्ये न्यायमूर्तींसह त्यांच्या कामकाजातही फेरबदल करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तीद्वय अनुप मोहता व पुखराज बोरा यांच्या युगलपीठाकडे २०१५ मध्ये दाखल जनहित याचिका व इतर न्यायपीठाला न दिलेल्या दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व नितीन सांबरे यांच्याकडे ३१ डिसेंबर २०१४ पर्यंतच्या सर्व जनहित याचिका, कौटुंबिक न्यायालय अपील, लेटर्स पेटेन्ट अपील, टॅक्स अपील, फर्स्ट अपील, न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अशोक भंगाळे यांच्या युगलपीठाकडे १९९८ पर्यंतच्या, २००० ते २००५, २०११ ते २०१३ व ३० जून २०१४ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका, तर न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांच्या युगलपीठाकडे सर्व फौजदारी याचिकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.एकलपीठामध्ये न्यायमूर्ती प्रसन्न वराळे हे फौजदारी अपील, जामीन व अटकपूर्व जामीन अर्ज, न्यायमूर्ती रवी देशपांडे हे २०००, २००२, २००४, २००६, २००८ व १ सप्टेंबर २०१४ पुढील दिवाणी रिट याचिका, २०१० पर्यंतच्या सेकंड अपील, न्यायमूर्ती सुनील शुक्रे फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज, २०१० पर्यंतच्या फौजदारी अपील, न्यायमूर्ती झेड. ए. हक फर्स्ट अपील, अपील अगेन्स्ट आॅर्डर, दिवाणी पुनर्विचार अर्ज, एमसीए, तर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर हे २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०१३ व १ जानेवारी २०१४ ते ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका व २०११ पासून पुढे दाखल सेकंड अपीलचे कामकाज पाहतील. (प्रतिनिधी)