शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

हायकोर्टाच्या रोस्टरमध्ये बदल

By admin | Published: August 17, 2015 2:57 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील रोस्टरमध्ये नियमित प्रक्रियेंतर्गत बदल करण्यात आला आहे.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील रोस्टरमध्ये नियमित प्रक्रियेंतर्गत बदल करण्यात आला आहे. नवीन रोस्टर १७ आॅगस्टपासून लागू होणार आहे. त्यानुसार ३० आॅगस्टपर्यंत नागपूर खंडपीठात चार द्विसदस्यीय न्यायपीठे कार्यरत राहणार आहेत. यानंतर एक द्विसदस्यीय न्यायपीठ औरंगाबाद खंडपीठात जाणार आहे.नवीन रोस्टरनुसार न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांच्याकडे जनहित याचिका, सर्व लेटर्स पेटेंट अपील्स व अन्य न्यायपीठाला न दिलेली फौजदारी प्रकरणे, न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्याकडे अन्य न्यायपीठाला न दिलेल्या दिवाणी रिट याचिका व सर्व फर्स्ट अपील्स, न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व ए. आय. एस. चिमा यांच्याकडे १९९८ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका, २०००, २००२, २००४, २००६ ते २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका व सर्व कौटुंबिक न्यायालय अपील्स तर, न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व इंदिरा जैन यांच्याकडे २०१० पर्यंतच्या फौजदारी अपील्सची जबाबदारी देण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व इंदिरा जैन हे ३० आॅगस्टपर्यंतच नागपूर खंडपीठात असून ३१ आॅगस्टपासून ते औरंगाबाद खंडपीठात कार्य करणार आहेत.एकल न्यायपीठांपैकी न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्याकडे सर्व सेकंड अपील्स, दिवाणी पुनर्विचार अर्ज, किरकोळ दिवाणी अर्ज व दिवाणी अवमानना संदर्भ, न्यायमूर्ती रवी देशपांडे यांच्याकडे २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०११, २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्याकडे २००० पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका, २००२, २००४, २००६, २००८, २०१०, २०१२ व २०१४ मधील दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्याकडे सर्व फर्स्ट अपील तर, न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्याकडे सर्व फौजदारी प्रकरणांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक गुरुवारी जुन्या प्रकरणांवर अंतिम सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)