शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

ट्रान्समिशन लाईनसाठी बदलली अंबाझरीची कॅटेगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 10:28 PM

Ambazari garden category केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ए कॅटेगरीत असलेल्या उद्यानात प्रकल्प उभारण्यासाठी पर्यावरण क्लिअरन्स (ईसी) गरजेचे आहे. मात्र वनविभागाच्या लेखी अंबाझरी उद्यान बी कॅटेगरीत असल्याने ईसी लागणार नाही. त्यामुळे ट्रान्समिशन लाईनचे काम राेखण्यास वनविभागाने नकार दिला आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या लेखी पर्यावरण क्लिअरन्सची गरज नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : अंबाझरी जैवविविधता उद्यानातून जात असलेल्या हाय ट्रान्समिशन पाॅवर लाईनबाबत वनविभागाची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. प्रधान वनसंरक्षक अधिकारी यांनी उपवनसंरक्षकांना लिहिलेल्या पत्रातून हेच दिसून येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ए कॅटेगरीत असलेल्या उद्यानात प्रकल्प उभारण्यासाठी पर्यावरण क्लिअरन्स (ईसी) गरजेचे आहे. मात्र वनविभागाच्या लेखी अंबाझरी उद्यान बी कॅटेगरीत असल्याने ईसी लागणार नाही. त्यामुळे ट्रान्समिशन लाईनचे काम राेखण्यास वनविभागाने नकार दिला आहे.

माजी वन्यजीव वार्डन जयदीप दास यांनी अंबाझरी उद्यानातून जाणाऱ्या हाय ट्रान्समिशन लाईनसाठी ईसी आवश्यक नाही का, असा प्रश्न वनविभागाला विचारला हाेता. त्यावर प्रधान वनसंरक्षक यांनी सादर केलेल्या पत्राचा उल्लेख दास यांनी केला आहे. दास यांनी याबाबत माहिती दिली. वन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ अंतर्गत तसेच २००६ च्या पर्यावरण परिणाम मूल्यांकाच्या परिपत्रकानुसार आणि केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बी कॅटेगरीच्या जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी ईसी घेण्याची गरज नाही. मात्र तलाव, संरक्षित जंगल किंवा प्रवासी पक्ष्यांचा अधिवास असेल तर ती जागा ए कॅटेगरीत गणल्या जाईल. यानुसार अंबाझरी जैवविविधता पार्क हे ए कॅटेगरीत गणल्या जाईल. असे असताना वनविभाग मात्र आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे.

तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचेही निर्देश

एमएसटीसीएलने ट्रान्समिशन लाईनसाठी ९०० झाडे ताेडण्याची परवानगी मागितली हाेती आणि ऑगस्ट २०१३ मध्ये पर्यावरण मंत्रालयाने परवानगीही दिली हाेती. त्यामुळे वनविभागाने ट्रान्समिशन लाईनचे काम थांबविण्याचा प्रश्नच उरत नाही. मात्र झाडांचे कमीतकमी नुकसान हाेईल आणि याच भागात वृक्षाराेपण करता येईल, यासाठी भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून यांच्याकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचा तसेच एफडीसीएम किंवा ट्राॅपिकल फाॅरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (टीएफआरआय), जबलपूर येथील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच काम सुरू करण्याची सूचनासुद्धा एमएसटीसीएलला केली आहे.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलावforest departmentवनविभाग