शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेमध्ये यंदापासून बदल

By admin | Published: June 02, 2016 3:13 AM

व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाच्या नावाखाली अनेकदा महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते.

प्रवेशाअगोदर विद्यार्थ्यांना करावी लागणार नोंदणी : आवडत्या महाविद्यालयांत प्रवेशाच्या चार संधीनागपूर : व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाच्या नावाखाली अनेकदा महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते. ही बाब लक्षात घेता ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) अभियांत्रिकीसोबतच इतरही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेच्या नियमांत बदल केले आहेत. व्यवस्थापन कोट्यातील जागांवरील प्रवेशातदेखील बदल झाला आहे. नव्या बदलांसह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत व्यवस्थापन कोट्यातील जागांवर ‘डीटीई’च्या सुविधा केंद्रात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालय प्रवेश देऊ शकणार आहेत. विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी अडचण येऊ नये यासाठी ‘एमएचटी-सीईटी’चे निकाल येण्याअगोदरच ही प्रक्रिया सुरू झाली होती. १५ जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.विद्यार्थ्यांचा फायदा होणारनव्या नियमांमुळे निश्चितपणे विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे. त्यांच्यावर कुठलेही महाविद्यालय किंवा अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा दबाव राहणार नाही. महाविद्यालय निवडण्यासाठी ते स्वतंत्र असतील. शिवाय त्यांना थेट महाविद्यालयात जावे लागणार नाही तर ‘एआरसी’मध्ये त्यांना यावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे शुल्क व गुणवत्तेची योग्य माहिती मिळू शकेल. खासगी संस्थांच्या अफवांना बळी पडू नका तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेत २०१६-१७ पासून बदल करण्यात आला आहे. परंतु काही खासगी संस्थांकडून विद्यार्थी व पालकांना संभ्रम निर्माण करणारी माहिती देण्यात येत आहे. अशा अफवांना विद्यार्थी व पालकांनी बळी पडू नये.यासंदर्भातील अधिकृत माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.दयानंद मेश्राम, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय