लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. काही विशेष गाड्याच चालविण्यात येत आहेत. त्यातच प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे नागपूर मार्गे धावणाºया सहा गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली०२४४२ नवी दिल्ली-बिलासपूर एक्सस्प्रेस शनिवारपासून नवी दिल्ली येथून दुपारी ३.४५ वाजता रवाना होईल. दुसºया दिवशी पहाटे ५.३० वाजता नागपुरात पोहोचेल आणि दुपारी १२ वाजता बिलासपूर स्टेशन गाठेल. ०२४४१ बिलासपूर-नवी दिल्ली एक्सस्प्रेस ६ जुलैपासून बिलासपूर येथून दुपारी २ वाजता रवाना होऊन रात्री ८.१५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि दुसºया दिवशी सकाळी १०.५० वाजता नवी दिल्ली स्थानक गाठेल.०२४३४ नवी दिल्ली-चेन्नई एक्सस्प्रेस गुरुवारपासून दुपारी ३.४५ वाजता नवी दिल्ली येथून रवाना होईल. दुसºया दिवशी पहाटे ५.२५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि रात्री ८.४० वाजता चेन्नई स्थानक गाठेल. ०२४३३ चेन्नई-नवी दिल्ली एक्सस्प्रेसा शनिवारपासून चेन्नई येथून सकाळी ६.३५ वाजता रवाना होईल. रात्री ९.१० वाजता नागपूरला पोहोचेल आणि दुसºया दिवशी सकाळी ११ वाजता नवी दिल्ली स्थानक गाठेल.०२४३८ नवी दिल्ली-सिकंदराबाद एक्सस्प्रेस रविवारपासून दुपारी ३.४५ वाजता नवी दिल्ली येथून रवाना होईल. पहाटे ५.२५ वाजता नागपूर स्थानक गाठेल आणि दुपारी २ वाजता सिकंदराबाद स्थानक गाठेल. ०२४३७ सिकंदराबाद-नवी दिल्ली एक्सस्प्रेस ८ जुलैपासून दुपारी १२.४५ वाजता सिकंदराबाद येथून रवाना होईल. रात्री ८.३५ वाजता नागपूरला पोहोचेल आणि दुसºया दिवशी सकाळी १०.५० वाजता नवी दिल्ली स्थानक गाठेल.