नागपूर : दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी उद्या, बुधवारी, २१ आॅक्टोबरला सकाळी ६ वाजेपासून २३ आॅक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत काही मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध घालण्याची अधिसूचना सह पोलीस आयुक्त राजवर्धन यांनी जारी केली. वाहतूक वळविण्याचे मार्गलोकमत चौकाकडून काछीपुरा चौकाकडे जाणारी वाहतूक ही कल्पना बिल्डिंग टी पॉर्इंट येथे उजवे वळण घेऊन रामदासपेठ, युनिव्हर्सिटी लायब्ररी चौक मार्गे जाईल. वर्धाकडून कृपलानी वळण मार्गे माताकचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक ही वर्धा रोडवरून अजनी चौक पूल, अजनी चौक येथे डावे वळण घेऊन आरपीटीएसमार्गे जाईल, तसेच लोकमत चौकाकडून कृपलानी वळणमार्गे माताकचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक वर्धा रोडवरून अजनी पूल चौक येथे उजवे वळण घेऊन आरपीटीएसमार्गे जाईल. अलंकार टॉकीजचौकाकडून काछीपुरा चौकाकडे जाणारी वाहतूक ही उत्तर अंबाझरी मार्गावरून शंकरनगर चौक व युनिव्हर्सिटी लायब्ररी चौकमार्गे जाईल. लक्ष्मीनगर चौकाकडून माताकचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक ही बजाजनगर चौकाकडे व आठ रस्ता मार्गे जाईल. नीरी टी पार्इंट ते माताकचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक ही आरपीटीएस व अजनीमार्गे जाईल. बजाजनगर चौकाकडून लक्ष्मीनगर चौकाकडे जाणारी वाहतूक व्हीएनआयटी चौक, अभ्यंकरनगर मार्गे जाईल. ऐनवेळी निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार व आवश्यकतेनुसार कर्तव्यावरील वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना एखादा मार्ग बंद करून योग्य मार्गाने वाहतूक वळविण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. (प्रतिनिधी)या मार्गांवर वाहनांना प्रवेश बंदकाछीपुरा चौक (कृषी महाविद्यालय वसतिगृह) ते माताकचेरी चौकापर्यंत दोन्ही बाजूंचे मार्ग, काछीपुरा चौक ते कल्पना बिल्डिंग टी पॉर्इंटपर्यंत दोन्ही बाजूंचे मार्ग, माताकचेरी चौक ते कृपलानी वळण, वर्धा रोडपर्यंतच्या दोन्ही बाजूंचा मार्ग, माताकचेरी चौक ते नीरी रोड टी पॉर्इंटपर्यंत, माताकचेरी चौक ते लक्ष्मीनगर चौक, काछीपुरा चौक ते बजाजनगर चौक, बजाजनगर चौक ते लक्ष्मीनगर चौक या मार्गांवरील दोन्ही बाजूंच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. फक्त काछीपुरा चौक ते बजाजनगर चौकापर्यंतचा मार्ग राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांकरिता, तात्पुरत्या बसस्थानकासाठी वापरता येईल.
दीक्षाभूमी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल
By admin | Published: October 21, 2015 3:13 AM