लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) बालरोग विभागातील वॉर्ड क्रमांक आठमध्ये पोलिसांनी एका अनोळखी नवजात शिशुला दाखल केले. परंतु बाळाचे डायपर बदलायचे कुणी, या प्रश्नाला घेऊन शनिवारी पोलीस आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला.प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी जरीपटका सुगतनगर बस थांब्याजवळ खासगी ट्रॅव्हलस बसमध्ये एक नवजात शिशु मिळाला. बसच्या सीट क्रमांक २३ च्याखाली हे शिशू ठेवला होता. ट्रॅव्हल्स कंपनीने जरीपटका पोलीस ठाण्याला याची माहिती देऊन शिशूला पोलिसांच्या हवाली केले. शिशूची प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला मेयोमध्ये आणले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून, कावीळ असल्याचे निदान केले. त्याला वॉर्ड क्रमांक आठमध्ये दाखल केले. शिशूच्या सुरक्षेसाठी जरीपटका पोलीस ठाण्याच्या महिला पोलिसाला तैनात करण्यात आले होते. उपचाराच्यादरम्यान शिशूने शौच केले. परंतु डायपर (पॅड) बदलण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचाऱ्यांपासून ते परिचारिका कुणीच तयार नव्हते. शिशू सतत रडत होता. महिला पोलिसाने कर्मचाऱ्यांना डायपर बदलण्याची विनंती केली. परंतु कर्मचाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. याला घेऊन वाद निर्माण झाला. कर्मचाऱ्याने याची जबाबदारी पोलिसांचीच असल्याचे सांगून निघून गेली. महिला पोलिसाने याची तक्रार पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्याकडे केली. दरम्यान तिने बाळाचे डायपर बदलविले. पोटे रुग्णालयात पोहचल्यावर मात्र, वॉर्डातील परिचारिकांपासून ते कर्मचारी काही बोलण्यास तयार नव्हते. पोलिसांना पाहून काही रुग्ण व नातेवाईकांनी रुग्णालयातील समस्या मांडण्यास सुरुवात केली.रुग्णाची जबाबदारी रुग्णालयाचीपोलीस निरीक्षक पोटे यांनी सांगितले, अनोळखी शिशूच्या सुरक्षेसाठी पोलीस महिलेला तैनात करण्यात आले होते. परंतु रुग्णाची काळजी घेण्याची जबाबदारी ही रुग्णालयाची असते. ते जर आपली जबाबदारी ढकलत असतील तर हे गंभीर प्रकरण आहे. या संदर्भात अधिष्ठात्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
डायपर बदलण्यावरून पोलीस - रूग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:13 AM
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) बालरोग विभागातील वॉर्ड क्रमांक आठमध्ये पोलिसांनी एका अनोळखी नवजात शिशुला दाखल केले. परंतु बाळाचे डायपर बदलायचे कुणी, या प्रश्नाला घेऊन शनिवारी पोलीस आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला.
ठळक मुद्देमेयो इस्पितळाच्या बालरोग विभागातील प्रकार