शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
8
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
9
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
10
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

नागपूरच्या सोनेगाव तलावाचा बदलतोय चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:11 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातील ऐतिहासिक तलावाचा वारसा यामध्ये सोनेगाव तलावाचाही समावेश आहे. भोसले काळात बांधलेल्या या तलावाचे ...

ठळक मुद्देविसर्जन थाबंविल्याने तलावाचे प्रदूषण थांबलेसौंदर्यीकरणाची कामे झाली परिसरातील लोकांची वाढली वर्दळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील ऐतिहासिक तलावाचा वारसा यामध्ये सोनेगाव तलावाचाही समावेश आहे. भोसले काळात बांधलेल्या या तलावाचे क्षेत्र ४० हेक्टरवर होते. मात्र लोकवस्ती वाढल्याने तलावाच्या जागेवर ले-आऊट पाडून तलावाचे क्षेत्रफळ आता १६.५९ हेक्टरवर आले आहे. प्रशासनाने २०१७ मध्ये तलावाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचाच परिपाक म्हणून शहरातील इतर तलावाच्या तुलनेत सोनेगावचा चेहरा आता बदलतो आहे. तलावाच्या संरक्षणासाठी स्थानिक लोकांचे पाठबळ मिळत आहे.तलावाचा इतिहाससोनेगाव तलाव सुमारे २५० वर्षांपूर्वी नागपूरच्या भोसले घराण्याच्या शासनकाळात भोसल्यांनी बांधला. सोनेगाव शिवारात असल्यामुळे याचे नाव सोनेगाव पडले. पूर्वी हा एक विस्तीर्ण तलाव होता. तलावाचा दगडी बांध अद्यापही मजबूत आहे. या तलावाचा वापर भोसले घराण्यातील लोक सहलीसाठी करीत व ८-१० दिवस येथे येऊन राहत. शेजारी बांधण्यात आलेल्या विहिरीत हत्ती-घोडे आत जाऊन पाणी पिऊ शकत. जवळच भोसल्यांनी पोहण्याचे टाके बांधले होते. या टाक्यात तलावातून पाणी सोडण्यात येत असे. त्याची पाईपलाईन सध्याही अस्तित्वात आहे. तलावाच्या काठावर गणपती आणि हनुमानाचे मंदिर आहे.तलावाची सद्यस्थितीप्रशासनाने तलावाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याने तलावाचे अस्तित्व अबाधित आहे. तलावात विसर्जनावर बंदी घातल्यामुळे तलावाच्या पाण्यात कचरा दिसून येत नाही. तलावाच्या पूर्वेकडील भागात संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. तलावाच्या काठावर जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. तलाव परिसरात हिरवळ राहावी म्हणून वृक्षारोपण केले आहे. तलावाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी बाके लावण्यात आली आहेत. मंदिराच्या परिसरात बसण्याची व्यवस्थाा केली आहे. तलाव परिसराची स्वच्छता नियमित होत आहे. सोनेगाव तलाव हा वरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तलावाचा जलस्तर कमी आहे. प्रशासनाने जलस्तर वाढविण्यासाठी विशेष उपाय केलेले नाही. त्यामुळे सध्या तलावाचा अर्धा भाग कोरडा पडला आहे.तलावाला खासगी मालकीतून मुक्त करण्याचा प्रयत्ननागपूर शहराच्या मंजूर विकास योजनेत सोनेगाव तलाव जलाशय म्हणून शासनाकडे नामनिर्देशित आहे. १५ ऑक्टोबर २००३ नुसार सोनेगाव तलाव हेरिटेज स्थळ म्हणून समाविष्ट आहे. या तलावाचे नगर भूमापन विभागाच्या मोजणीनुसार नकाशाप्रमाणे एकूण क्षेत्र १६.५९ हेक्टर असून त्यावर खासगी मालकी होती. या जागेची सार्वजनिक प्रयोजनार्थ आवश्यकता असल्याने व ही जागा संपादित करण्याचा मनपाचा मानस असल्याने सोनेगाव तलावाची संपूर्ण जागा संवैधानिक कार्यवाही करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत आरक्षण विकास योजनेत समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी झाले प्रयत्नतलावाकडे दुर्लक्ष झाल्याने तलावात गाळ व माती साचली होती. तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प प्रशासनाने केला होता. पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रशासनाचा मानस होता. तलावात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. तलावातील सुप्त जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यात येणार होते. तलावातील लुप्त झालेल्या झऱ्यांचा शोध घेण्यात येणार होता. म्युझिकल कारंजे निर्माण होणार होते. दोन बाजूंना उद्यान, तलावाच्या परिसरात दिवे लावणे, जॉगिंग ट्रॅक, तलाव परिसरात वृक्षारोपण, परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार होते. ही संपूर्ण मोहीम भूजल सर्वेक्षण विभागाचे माजी सहसंचालक चेतन गजभिये यांच्या नेतृत्वात संपन्न होणार होती. यासाठी सात कोटी रुपये शासन व स्थानिक प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार होते. यातील काही प्रयत्न झाल्याचे दिसून येते.हे प्रयत्न झाले नाहीतलावात म्युझिकल कारंजे बसले नाही. दोन्ही बाजूंना उद्यान विकसित झाले नाही. तलावाच्या सभोवताली पथदिवे लागले नाही. नाला बंडिग झाले नाही. पोहना नदी व परिसरातील नाले वळविण्यात आले नाही. सध्याची तलावातील पाण्याची स्थिती लक्षात घेता रिचार्ज शॉप मारलेले दिसत नाही.हे प्रयत्न झालेगाळ व माती काढण्यात आली. काही प्रमाणात लिकेजचीही दुरुस्ती झाली. वॉकिंग ट्रॅक झाला. विसर्जनाचा कचरा कमी झाला. वृक्षारोपण व सौंदर्यीकरणासाठी प्रयत्न झाले.

 

टॅग्स :Sonegaon Lakeसोनेगाव तलावnagpurनागपूर