लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात नागपूर शहरातील विकास कामांसाठी १ हजार कोटींचा निधी मिळाला. त्यांचा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील विकास कामांसाठी १५० कोटींचा विशेष निधी मिळाला. या भागातील सिमेंट रोड, सिवरेज लाइन, अंतर्गत रस्ते अन्य विकास कामांवर हा निधी खर्च झाला. या भागाचा चौफेर विकास झाल्याचा दावा मनपातील भाजपचे पदाधिकारी करतात
माटे चौक ते पडोळे चौकापर्यंतच्या एक किलोमीटर रस्त्यांची पार दुर्दशा झालेली आहे. जागोजागी खड्डे आहेत. या रस्त्यावर बाजार भरतो, हातठेले व भाजी विक्रेते उभे राहतात. आजूबाजूच्या नागरिकांना घरातून बाहेल पडणे अशक्य होते. गायत्रीनगर, कामगार कॉलनी, तुकडोजीनगर या भागात सिवरेजची गंभीर समस्या आहे. जनता सोसायटी लगतच्या गार्डनला अवकळा आली आहे. सर्वत्र गवत वाढले आहे. जीमची साधने बसविण्यात आली
.....
गार्डनला अवकळा
नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शहरातील उद्यानात जीम बसविण्यात आले आहे. यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, हा खर्च पाण्यात तर गेला नाही ना? असा प्रश्न शहरातील उद्यानातील जीमची अवस्था बघून पडतो. अशीच अवस्था जनता सोसायटी येथील गार्डनची झाली झाली आहे. व्यायामाची साधने बसविण्यात आली
.....
जागोजागी कचरा, खुल्या प्लाॅटवर झाडे
जनता सोसायटी लगत मुख्य रस्त्याला लागून असलेल्या खुल्या भूखंडावर मोठी झाडे वाढली आहेत. येथे मातीचे ढीग व गवत वाढले आहे. त्यातच येथे कचरा टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांना डासांचा त्रास होतो. पावसाळ्याच्या दिवसांत पाण्याचा निचरा होत नाही. सिवरेज नादुरुस्त असल्याने नळाला दूषित पाणी येत असल्याबाबत वारंवार तक्रार करूनही मनपा प्रशासनाकडून याकडे लक्ष दिले जात नाही, अशी व्यथा या परिसरातील नागरिकांनी मांडली.
....
अशा आहेत समस्या
माटे चौक ते पडोळे चौकादरम्यानच्या रस्त्यांवर जागोजागी खड्डे.
सिवरेज नादुरुस्त असल्याने विहिरींचे पाणी दूषित.
उद्यानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष.
पावसाळी नाल्यात कचरा साचल्याने पावसाळयात पाणी साचते.
खुल्या प्लाॅटवर कचरा साचून असल्याने डासांचा त्रास.
रस्त्यांवरील बाजारामुळे रहदारीला अडथळा.
....
नादुरुस्त रस्ता, बाजाराचा त्रास
गोपालनगरातील मुख्य रस्त्यांवर बाजार भरतो. हातठेले रस्त्यांवर उभे केले जातात. सायंकाळी नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होते. यातून विक्रेते व घरमालक यांच्यात वाद होतो. रस्त्यांची मागील दहा वर्षांत दुरुस्ती झालेली नाही. धुळीमुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. अतिक्रमणाबाबत तक्रार करूनही मनपाकडून कारवाई केली जात नाही.
-आनंदराव वैरागडे, नागरिक
....
पावसाळ्यात साचते पाणी
माटे चौक ते पडोळे चौकादरम्यानचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. रस्त्यांवर जागोजागी सिवरेज दुुरुस्तीसाठी वेळोवेळी खोदकाम केले जाते. त्याची माती व मलबा तसाच पडून राहतो. पावसाळ्याच्या दिवसांत पडोळे चौक परिसर जलमय होतो
-नरेंद्र भगत, नागरिक
....
गार्डनमध्ये मुलांना खेळता येत नाही
जनता सोसायटी लगतच्या गार्डनमध्ये गवत व झुडपे वाढली असल्याने लहान मुलांना खेळता येत नाही. येथे जीमची साधने बसविण्यात आली
-मीना महाजन, नागरिक
....
रस्त्याची दुरुस्ती व्हावी
नागपूर शहरात सर्वत्र सिमेंट रोड होत आहेत. फूटपाथ चांगले होत आहेत. पावसाळी नाल्याची कामे होत आहेत
-मधुसूदन पाटील, नागरिक