सुनीलसिंग गौर असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून, ते साकेतनगर येथील रहिवासी आहेत. गौर यांना त्यांचे १२ लाख ४० हजार रुपये आणि त्यावर १८ मार्च २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत १८ टक्के व्याज किंवा वादग्रस्त तीन भूखंडांची वर्तमान सरकारी दराने असलेली किंमत, यापैकी जास्त होईल ती रक्कम एक महिन्यात अदा करावी, असा आदेश आयोगाने इमॅजिनेशन इन्फ्राला दिला आहे. याशिवाय गौर यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता एक लाख रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाईदेखील मंजूर केली आहे. कंपनीने मौजा सोंडापार, जि. हिंगणा येथील तीन भूखंडांचे विक्रीपत्र करून दिले नाही व स्वीकारलेले १२ लाख ४० हजार रुपयेही परत केले नाही. त्यामुळे गाैर यांनी आयोगात तक्रार दाखल केली होती. गौर यांच्यातर्फे ॲड. अशोक रेवतकर यांनी बाजू मांडली.
इमॅजिनेशन इन्फ्रा कंपनीला चपराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:08 AM