शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

चुनाभट्टी खुनी हल्ल्यातील आरोपीचा जामीन फेटाळला

By admin | Published: May 15, 2016 2:42 AM

धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी येथील एका खुनी हल्ल्याच्या घटनेतील आरोपी सूत्रधाराचा जामीन आदेश...

नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी येथील एका खुनी हल्ल्याच्या घटनेतील आरोपी सूत्रधाराचा जामीन आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादिक उमर यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. निकुंज कमलाकर मेश्राम (२६) असे आरोपीचे नाव असून, तो दाभा येथील रहिवासी आहे. प्रकरण असे की, कौशल्यायननगर येथील फिर्यादी अनिता संजय अलोणे हिचा पती संजय अलोणे आणि साथीदारांनी फरार असलेला मुख्य सूत्रधार रामबाग येथील रहिवासी बादल राजू गजभिये याचे वडील राजू गजभिये यांचा गतवर्षी क्षुल्लक कारणावरून सशस्त्र हल्ला करून खून केला होता. वडिलाच्या खुनाचा सूड म्हणून बादलने आपल्या साथीदारांची जुळवाजुळव करून चुनाभट्टी भागात २५ एप्रिल २०१६ रोजी रात्री ९.३० ते ११ वाजताच्या दरम्यान तलवार, लाठीकाठ्या आणि दगडाने हल्ला करून संजय अलोणे याचा मुलगा सौरभ (१९) याला गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी अनिता अलोणे हिच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ३०७, ३९७, १०२ (ब), २०१, शस्त्र कायद्याच्या ४/२५, मुंबई पोलीस कायद्याच्या ३७(१)(३), १३५, १४२ कलमान्वये गुन्हा दाखल करून नऊ आरोपींना अटक केली होती. त्यापैकी तीन जण विधिसंघर्षग्रस्त बालक आहेत. अटक झालेल्या अन्य आरोपींमध्ये अमन जीवन खरे (२२) रा. न्यू वाल्मिकी कॉलनी इमामवाडा, अश्वजित ऊर्फ मोन्टी राजेंद्र कांबळे (२२), प्रशांत ऊर्फ टन्ना कृष्णराव लोंढे (२२) दोन्ही रा. वसंतनगर झोपडपट्टी, शुभम शंकर पारखंडे (२१), मोनू ऊर्फ छोटा पन्नी सुरेश कटोते (१९) दोन्ही रा. कौशल्यायननगर यांचा समावेश आहे. या प्रकरणातून मुख्य सूत्रधार बादल राजू गजभिये याच्यासह पलाश विजय दिवटे (२२) रा. अयोध्यानगर, आदित्य प्रदीप बागडे (२१) कुकडे ले-आऊट आणि प्रणय राजेंद्र कांबळे (२०) रा. वसंतनगर हे फरार आहेत. अटक आरोपींपैकी निकुंज मेश्राम याने जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, प्रकरण गंभीर असल्याने तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील वसीम काझी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)