लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील सिनेमा तसेच सामाजिक क्षेत्राला जबरदस्त हादरा देणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेच्या वादात आता चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनीदेखील उडी घेतली आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार वेळीच समोर यायला हवे, मात्र ‘सोशल मीडिया’चा दुरुपयोग करून कुणाच्याही चारित्र्याचे हनन करणेदेखील अयोग्य आहे. ‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य आहेत हे कशावरुन याचीदेखील चाचपणी व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.‘नागपूर प्रेस क्लब’तर्फे आयोजित ‘मीट द प्रेस’दरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, वरिष्ठ पत्रकार राहुल पांडे उपस्थित होते. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी यात दुमत असण्याचे कारणच नाही. मात्र, या मोहिमेतून अनेकांची नाहक बदनामी होत आहे. याचा परिणाम हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही होत असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेतील सगळेच खरे बोलत आहेत असे नसून अनेक लोक हे ‘बहती गंगा मे’ हात धुण्याचे काम करीत आहेत. यात काहींचे आरोप खरे असले तरी काही मुली केवळ प्रसिद्धी झोतात येणे किंवा बदला घेण्याच्या भावनेने आरोप करीत असल्याचेही ते म्हणाले.चित्रपटांवर परिणाम नाही‘मी टू’ मोहिमेमुळे येणाऱ्या आगामी चित्रपटांवर फारसा परिणाम होणार नाही. प्रेक्षकांना चित्रपटाशी घेणेदेणे असते. चित्रपटाचे कथानक, मांडणी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोरंजन याला महत्त्व असते. त्याचा व्यवसायावर परिणाम होत नाही. ‘मी टू’अंतर्गत आरोप झाले म्हणून उतावीळ होत कलाकारांनी आता मी या दिग्दर्शकासोबत काम करणार नाही अशी भूमिका घेणे अयोग्य असल्याचेदेखील कोमल नाहटा यांनी प्रतिपादन केले.
‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 1:20 AM
देशातील सिनेमा तसेच सामाजिक क्षेत्राला जबरदस्त हादरा देणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेच्या वादात आता चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनीदेखील उडी घेतली आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार वेळीच समोर यायला हवे, मात्र ‘सोशल मीडिया’चा दुरुपयोग करून कुणाच्याही चारित्र्याचे हनन करणेदेखील अयोग्य आहे. ‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य आहेत हे कशावरुन याचीदेखील चाचपणी व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
ठळक मुद्देकोमल नाहटा यांचा प्रश्न : गैरप्रकार समोर यायला हवे, मात्र दुरुपयोग नको