लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महामेट्रोतर्फे आणखी एक पाऊल उचलत ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड (एनर्जी एफिसिएन्सी सर्व्हिस लिमिटेड) या भारत सरकार, ऊर्जा मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनीसोबत गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला. महामेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रोक्युरमेट विभाग) आनंद कुमार आणि ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड विभागाचे (पूर्व महाराष्ट्र) प्रादेशिक प्रमुख किशोर चव्हाण यांनी करारावर स्वाक्षरी केली. या प्रसंगी महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक(वित्त) एस. शिवमाथन उपस्थित होते.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सातत्याने सौर ऊर्जेच्या वापरावर भर दिला आहे. मेट्रोच्या चार स्टेशन आणि मेट्रो भवनावर सौर पॅनल लावल्याने सौर ऊर्जेची निर्मिती व वापर होत आहे. टप्याटप्याने सर्व स्टेशनवर सौर ऊर्जेचे पॅनल बसविणार आहे. पर्यावरणपूरक मेट्रोची संकल्पना राबवताना मेट्रो स्टेशन येथे चार्जिंग पॉर्इंट स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित मेट्रो स्टेशनवर आतापर्यंत ९३५ सोलर पॅनल लावण्यात आले आहे. ६५ टक्के ऊर्जा सौर ऊर्जा प्रकल्पातून घेण्याचा महामेट्रोचा मानस आहे.केंद्राच्या ऊर्जा मंत्रालयाद्वारे ७ मार्च २०१८ रोजी राष्ट्रीय ई-मोबिलिटी कार्यक्रम आखल्या गेला. याअंतर्गत ई-वाहन आणि सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या उद्देशांतर्गत करार करण्यात आला. या अंतर्गत ऊर्जा विभागातर्फे मेट्रो स्टेशनवर चार्जिंग उपकरणे आणि विद्युत व्यवस्था बसविण्यात येईल. त्या मोबदल्यात महामेट्रोला जागेचे भाडे मिळेल. ही सेवा आतापर्यंत दिल्ली आणि चेन्नई येथे सुरू असून आता नागपुरात उपलब्ध होणार आहे. स्टेशनवर वाहनांच्या चार्जिंगची सोय उपलब्ध होणार असल्याने इलेक्ट्रिक वाहन वापरणारे मेट्रोचे प्रवासी व इतरांना दिलासा मिळेल. या माध्यामातून एकीकडे पर्यावरण रक्षणाच्या मेट्रोच्या संकल्पनेला बळ मिळेल तर दुसरीकडे मेट्रोच्या लास्टमाईल कनेक्टिीव्हीटी योजनेची अंमलबजावणी होईल. चार्जिंग पॉर्इंटवर लिथियम निर्मित बॅटरीने वाहनांचे चार्जिंग होणार आहे. चारचाकी वाहनाला चार्ज व्हायला एक तास लागतो. त्यामध्ये १४ युनिट ऊर्जा चार्ज होते आणि वाहन १२० कि़मी.पर्यंत धावते.कराराप्रसंगी महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सोलर व स्टेशन) हिमांशू घटूवारी, उपमहाव्यवस्थापक (सोलर) नरेंद्र अहिर, ऊर्र्जा दक्षता सेवा विभागाचे सहायक अभियंता कुणाल सोनी, जीजोबा पारधी, दीपांकर बागडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
नागपुरात मेट्रो स्टेशन होणार चार्जिंग स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 10:48 AM
नागपूर मेट्रोच्या चार स्टेशन आणि मेट्रो भवनावर सौर पॅनल लावल्याने सौर ऊर्जेची निर्मिती व वापर होत आहे. टप्याटप्याने सर्व स्टेशनवर सौर ऊर्जेचे पॅनल बसविणार आहे.
ठळक मुद्देमहामेट्रो आणि ऊर्जा दक्षता सेवा लि.दरम्यान करारपर्यावरण संवर्धन दिशेने पाऊल