शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

तिचा पाठलाग करणे, ढकलणे विनयभंग नाही - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 9:29 AM

एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने वर्धा येथे एफआयआर दाखल केला होता की, ती सायकलवरून बाजारात जात असताना मोहम्मद एजाज शेख इस्माईलने तिचा पाठलाग केला.  नंतर त्याने तिला शिवीगाळ केली व ढकलले. इस्माईलने यापूर्वीही तिचा पाठलाग केला होता.

डॉ. खुशालचंद बाहेती -

नागपूर : महिलेचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे आणि सायकल चालवताना ढकलणे, हा विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने म्हटले आहे.

एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने वर्धा येथे एफआयआर दाखल केला होता की, ती सायकलवरून बाजारात जात असताना मोहम्मद एजाज शेख इस्माईलने तिचा पाठलाग केला.  नंतर त्याने तिला शिवीगाळ केली व ढकलले. इस्माईलने यापूर्वीही तिचा पाठलाग केला होता.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात वर्धा न्यायालयाने इस्माइलला ३५४ आयपीसीअंतर्गत विनयभंग केला म्हणून दोषी ठरवत शिक्षा दिली. सत्र न्यायाधीशांनी शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळले म्हणून इस्माईलने उच्च न्यायालयात धाव घेतली.

आरोपीने तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला किंवा शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाला धक्का दिला, ज्यामुळे तिला लज्जा वाटली, हे मुलीने सांगितले नसल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.

‘सायकलवर असताना आरोपीने धक्का दिला, याला तक्रारदाराच्या शालीनतेला धक्का पोहोचवणारे कृत्य म्हणता येणार नाही. हे कृत्य आक्षेपार्ह किंवा त्रासदायक असू शकते; परंतु त्यामुळे महिलेचा विनयभंग झाला असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी मोहम्मद इस्माइलची ३५४ आयपीसीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात हायकोर्टाने राजू पांडुरंग महाले विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानुसार, कलम ३५४ आयपीसीचा गुन्हा होण्यासाठी एखाद्या महिलेवर आरोपीने विनयभंगाच्या हेतूने बळाचा वापर करणे आवश्यक असते.

हायकोर्टाचे निरीक्षणएखाद्या महिलेचा काही वेळा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे आणि तिला सायकल चालवताना ढकलणे हे त्रासदायक असू शकते; परंतु यामुळे स्त्रीच्या शालीनतेच्या भावनेला धक्का बसणार नाही, म्हणून हे कृत्य विनयभंग ठरत नाही. - न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे,मुंबई हायकोर्ट, नागपूर खंडपीठ

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMolestationविनयभंगnagpurनागपूर