चतुर्वेदींचे शक्तिप्रदर्शन : काँग्रेस वर्तुळात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:32 PM2018-10-12T22:32:45+5:302018-10-12T22:33:45+5:30
काँग्रेस पक्षातून निष्काषित केल्यानंतरही माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी मात्र काँग्रेसचा मार्ग सोडलेला नाही. चतुर्वेदी यांनी वाढदिवशी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. बहुतांश समर्थक नेते व कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा मुत्तेमवार विरोधी गट ताकदीने सक्रिय होण्याचे संकेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेस पक्षातून निष्काषित केल्यानंतरही माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी मात्र काँग्रेसचा मार्ग सोडलेला नाही. चतुर्वेदी यांनी वाढदिवशी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. बहुतांश समर्थक नेते व कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा मुत्तेमवार विरोधी गट ताकदीने सक्रिय होण्याचे संकेत आहेत.
चतुर्वेदी यांच्या स्वागतासाठी सिव्हील लाईन्सच्या करोडपती गल्लीतील 'महाविद्या' बंगल्यावर बुधवारी नेते व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री अनिस अहमद, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड,महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, प्रदेश सचिव प्रफुल्ल गुडधे, नितीन कुंभलकर, नगरसेवक कमलेश चौधरी, जुल्फिकार भुट्टो, पुरुषोत्तम हजारे, किशोर जिचकार, दिनेश यादव, नेहा निकोसे, परसराम मानवटकर, आशा उईके, शाहिदा बेगम, जिशान मुमताज, प्रणीता शहाणे, मनोज गावंडे, स्नेहा निकोसे, सुभाष खोडे, इब्राहिम चुडिवाले, कुसुम बावनकर, परमेश्वर राऊत, श्रीकांत कैकाडे, राजू महाजन, राजेश जरगर, नीरज चौबे, नियामत ताजी, अविनाश मैनानी, चंदू पांडे आदींनी हजेरी लावली. ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार गिरीश गांधी यांनीही भेट घेतली.
काँग्रेसने निष्कासित केल्यानंतरही समर्थकामध्ये जोश होता. चतुर्वेदींच्या घरवापसीसाठी पुन्हा एकदा दिल्लीत फिल्डिंग लावण्याचे संकेतही यावेळी समर्थकांनी दिले.