सावनेर/हिंगणा/काटोल/नरखेड/कुही/कन्हान/रामटेक : जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात २१९ नव्या रुग्णांची नोंद झाली. यातील ६९ रुग्ण हे एकट्या सावनेर तालुक्यातील आहेत.
सावनेर शहरात पुन्हा २७ रुग्णांची भर पडली. तालुक्यातील दहेगाव येथे १३, पाटणसावंगी आणि बोरुजवाडा येथे प्रत्येकी ५, एमएसईबी कॉलनी (४), खापरखेडा (३), तर नांदागोमुख, खापा आणि कोटोडी येथे प्रत्येकी २ तर रोहना, वाकोडी, सावंगी, बडेगाव, इसापूर, चनकापूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ४७७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील १८, डिगडोह व हिंगणा येथे प्रत्येकी ६, टाकळघाट व सुकळी (बेलदार) प्रत्येकी २, नागलवाडी, नीलडोह, कान्होलीबारा, टेंभरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४३५० इतकी झाली आहे. यातील ४००६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नरखेड तालुक्यात पुन्हा ३० रुग्णांची भर पडली आहे. यात ६ रुग्ण शहरातील २४ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सध्या ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २०३ तसेच शहरातील ४६ इतकी झाली आहे. शुक्रवारी जलालखेडा येथे (३),भारसिंगी (१), सिंजर (७), साखरखेडा (८) तर मोवाड येथे ५ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात कोरोना साखळीचा सातत्याने विस्तार होतो आहे. तालुक्यात शुक्रवारी ३० रुग्णांची भर पडली. यात काटोल शहरातील १९, तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. काटोल शहरातील पुरुषोत्तम मंदिर येथील सात, रामदेव बाबा ले-आऊट येथे दोन, तर पंचवटी, थोमा ले-आऊट, फल्ली मार्केट, रमण चांडक नगर, जानकी नगर, राठी ले-आऊट, साठवणे ले-आउट, राऊतपुरा, आयुडीपी, वाघमारे ले-आऊट येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये डोरली (भांडवलकर) येथील चार रुग्ण, लिंगा येथे दोन तर रिधोरा, येनवा, अंबाडा, खंडाळा, हेटी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कन्हान कोविड सेंटर येथे शुक्रवारी २५८ जणांची चाचणी करण्यात आली. त्यात ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ९८९ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ९०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कन्हान परिसरात ५६ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी यांनी दिली.
रामटेक तालुक्यात शुक्रवारी ६ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील गांधी वॉर्ड व भगतसिंग वॉर्ड येथील प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात मनसर येथे दोन, तर सीतापूर व तोतलाडोह येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
मेंढेगाव,मांढळ येथे धोका वाढला
कुही तालुक्यात शुक्रवारी ३३ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात मेंढेगाव व मांढळ येथे रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रे व कुही कोविड सेंटरवर २३८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात मेंढेगाव येथील २४, मांढळ (८) व वेलतूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.