लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांची २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीला सेवाग्राम येथील बापुकुटीला भेट व काँग्रेस कार्यसमितीची बैठकही निश्चित झाली आहे. या दौऱ्याच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे सोमवारी वर्धा येथे दाखल होणार आहेत; सोबतच विशेष सुरक्षा पथक(एसपीजी)देखील दाखल होणार असून, सुरक्षेचा आढावा घेणार आहे.प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांनी शनिवारी मुंबईतील टिळक भवनात नागपूर व वर्धा जिल्ह्यातील निवडक नेत्यांची बैठक घेतली. बैठकीत राहुल गांधी यांचा दौरा निश्चित झाला असल्याचे तसेच कार्यसमितीची बैठक घेणेही निश्चित असल्याचे स्पष्ट केले. या दौऱ्यासाठी आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या. कार्यसमितीच्या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख काँग्रेस नेते दाखल होतील. त्यांच्या व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. राहुल गांधी यांची वर्धा येथे जाहीर सभा घेता येईल की पदयात्रा काढता येईल, यावरही चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ५० हजार कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी जमवून राहुल गांधी यांचे स्वागत करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.चव्हाण सोमवारी वर्धा येथे पूर्व विदर्भातील निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यानंतर वर्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतील. यानंतर ते स्थानिक नेत्यांचीही बैठक घेणार आहेत. एसपीजीच्या अहवालानंतर राहुल गांधी यांनी मिनिट टू मिनिट दौरा निश्चित होईल.नागपुरातून निघणार रॅली २ आॅक्टोबर रोजी नागपूर शहर काँग्रेसतर्फे नागपूर ते सेवाग्राम रॅली काढली जाणार आहे. सुमारे ४०० गाड्यांचा ताफा यात सहभागी होईल, असे नियोजन केले जात आहे.
राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी चव्हाण करणार पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 10:52 PM
अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांची २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीला सेवाग्राम येथील बापुकुटीला भेट व काँग्रेस कार्यसमितीची बैठकही निश्चित झाली आहे. या दौऱ्याच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे सोमवारी वर्धा येथे दाखल होणार आहेत; सोबतच विशेष सुरक्षा पथक(एसपीजी)देखील दाखल होणार असून, सुरक्षेचा आढावा घेणार आहे.
ठळक मुद्दे एसपीजी सोमवारी सेवाग्राममध्ये : कार्यसमितीच्या बैठकीवरही शिक्कामोर्तब