नागपूर : अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थींना एप्रिल व मे या दोन महिन्यांकरिता धान्यसाठा शहर पुरवठा विभागातील ६८२ रेशन दुकानांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ज्या शिधापत्रिकाधारकांनी एप्रिल महिन्यातील धान्याची उचल केली आहे, त्यांनी मे महिन्याचे धान्य मोफत घ्यावे, असे अन्नधान्य वितरण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
प्रत्येक क्षेत्रातील स्थलांतरितांना पोर्टेबिलिटी सुविधेतर्गंत या योजनेचा लाभ घेता येईल. सुविधा अंतर्गत धान्य स्वीकारणाऱ्या शिधापत्रिकाधारकांनी योजनेचा लाभ घ्यावा. कोरोना प्रादुभार्वामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य सरकारने एक महिना आणि केंद्र सरकारने दोन महिन्याचे असे तीन महिने मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. ग्रामीण भागातही लाभार्थींनाही मोफत धान्य मिळणार आहे. जिल्ह्यातील ३२ लाख ५७ हजार १३१ नागरिकांना महिन्याकाठी प्रत्येकी पाच किलो धान्य मोफत मिळणार आहे.