शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

नागपुरात बोर्डाच्या परीक्षा प्रक्रियेला ठगबाजांचा छेद : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:51 PM

परीक्षा केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे परीक्षार्थी म्हणून बसलेल्या ठगबाजांनी दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेसोबत बोर्डाच्या उत्तरपत्रिकाही बाहेर आणल्या. त्याबदल्यात बनावट उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहून त्या परीक्षा केंद्राधिकाऱ्यांच्या स्वाधीन केल्या. अशा अफलातून प्रकारे शिक्षण विभागाची फसवणूक करण्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले.

ठळक मुद्देबनावट ओळखपत्र, बनावटच उत्तरपत्रिका, मोठ्या टोळीच्या सहभागाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परीक्षा केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे परीक्षार्थी म्हणून बसलेल्या ठगबाजांनी दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकेसोबत बोर्डाच्या उत्तरपत्रिकाही बाहेर आणल्या. त्याबदल्यात बनावट उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहून त्या परीक्षा केंद्राधिकाऱ्यांच्या स्वाधीन केल्या. अशा अफलातून प्रकारे शिक्षण विभागाची फसवणूक करण्याचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले असून, जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी अतुल ऊर्फ गुड्डू शिवमोहन अवस्थी (वय ३५, रा. कपिलनगर कार्पोरेशन शाळेजवळ), चंद्रू ऊर्फ चंद्रकांत मते (वय ३६, रा. फरस चौक, मानकापूर) आणि अमन मुकेश मोटघरे (वय १९, रा. मायानगर, इंदोरा) या तिघांना अटक केली. त्यांचा चौथा साथीदार अल्पवयीन आहे.आरोपी अतुल अवस्थी एका फायनान्स कंपनीत तर चंद्रकांत मते खासगी कंपनीत काम करतो. अमन मोटघरे कॉम्प्युटरचा तज्ज्ञ आहे. श्रीमंतीच्या हव्यासापोटी या तिघांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बनावट ओळखपत्राच्या आधारे परीक्षार्थी बसवायचे आणि त्याला मिळणाऱ्या उत्तरपत्रिका बाहेर आणून आधीच बनवून (लिहून) ठेवलेल्या बनावट (डुप्लीकेट) उत्तरपत्रिका द्यायच्या, असा गोरखधंदा सुरू केला. या गोरखधंद्यासाठी त्यांनी अभ्यास न करता परीक्षेत पास होण्याची मानसिकता बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरणे सुरू केले. त्यांच्याकडून बक्कळ पैसा घेतल्यानंतर ते त्यांना मिळालेल्या ओळखपत्रावर दुसऱ्याचा फोटो बेमालुमपणे चिपकवत होते. त्यानंतर त्या बोगस विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात पाठवून त्याच्याकडून ते आधीच तयार करवून ठेवलेल्या उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांवर देत होते. भीम चौकातील एका परीक्षा केंद्राच्या बाजूला असलेल्या खोलीत बसून ते हा गैरप्रकार करीत असल्याचे कळाल्याने जरीपटका पोलिसांनी तेथे छापा घातला. अतुल, चंद्रकात आणि अमन तसेच त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले.हवालदाराच्या सतर्कतेमुळे भंडाफोडजरीपटक्यातील नमूद परीक्षा केंद्राच्या बाहेर सोमवारी एक विद्यार्थी बसलेला होता. आतमध्ये पेपर सुरू असताना विद्यार्थी बाहेर काय करतो, असा प्रश्न पडल्याने हवालदार बंडू कळंबे यांना शंका आली. त्यांनी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. संशय बळावल्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याची चौकशी केल्यानंतर या धक्कादायक प्रकरणाचा भंडाफोड झाला. त्यानंतर पोलिसांनी उपरोक्त आरोपींना ताब्यात घेतले. चौथा अल्पवयीन असल्याने त्याला सोडून देण्यात आले. तर, तिघांविरुद्ध कलम ४२०, ४६८, ४७१, ३४, भादंवि तसेच सहकलम ६, ७ महाराष्ट्र प्रिव्हेन्शन आॅफ मॉल प्रॅक्टिस अ‍ॅक्ट बोर्ड युनिव्हर्सिटी अ‍ॅन्ड अदर पेसिफाय एक्झामिनेशन अ‍ॅक्ट १९८२ अन्वये त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली.दोन वर्षांपासून गोरखधंदाउपरोक्त आरोपी गेल्या दोन वर्षांपासून हा गोरखधंदा करीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून, गेल्या वर्षी सहा तर आतापर्यंत पाच विद्यार्थ्यांचे पेपर अशा पद्धतीने आरोपींनी सोडवून दिल्याचेही उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच आरोपी हेरत होते. पेपर सुटल्यानंतर ते अनेकांशी संपर्क साधायचे. कुणाचा पेपर चांगला गेला नसेल तर आम्ही तुमची मदत करून तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून देऊ शकतो, अशी हमी आरोपी द्यायचे. स्वत:चा मोबाईल नंबर देऊन नंतर त्याच्यासोबत मोलभाव ठरवत होते.टोळीत कोण कोण?या तिघांसोबत आणखी त्यांच्या टोळीत कोण कोण सहभागी आहेत, त्याची आता पोलिसांनी चौकशी चालविली आहे. बोर्डाची कुणी मंडळी या गोरखधंद्यात आरोपींना मदत करीत होती काय, त्यांनी किती विद्यार्थ्यांचे पेपर सोडविले. त्यांच्याकडे फिजिक्स, झुआलॉजी, बायोलॉजीच्या पूर्ण सोडविलेल्या उत्तरपत्रिका कशा आल्या. त्या बनावट आहेत की बोर्डातून त्यांना कुणी त्या पुरविल्या, त्याची आम्ही चौकशी करीत असून, बोर्डाचे विभागीय सचिव देशपांडे यांनाही यासंबंधाने एक पत्र देऊन चौकशीची कल्पना देण्यात आल्याची माहिती जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीexamपरीक्षा