लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाइन दारू विकत मागविण्याच्या प्रक्रियेत दोन व्यक्तींची रक्कम सायबर गुन्हेगारांनी लंपास केली.गेल्या अनेक दिवसांपासून मद्याची दुकाने बंद होती. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन मद्य पुरविल्या जात असल्याच्या जाहिराती इंटरनेटवर अपलोड केल्या. त्यावर नमूद मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आरोपींनी संबंधितांना त्यांच्या बँक खात्याची माहिती मागितली. दोघांना सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली. ती ओपन करताच त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. फसवणुकीच्या अशा दोन घटनाची तक्रार सायबर शाखेत झालेली आहे. ही रक्कम किती आणि ते दोघे कोण, हे मात्र पोलिसांनी स्पष्ट केले नाही. ऑनलाईन खरेदी करताना मिळालेल्या ऑफर्सला बळी पडू नका, असे आवाहन सायबर शाखेने केले आहे ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचेही आवाहन सायबर शाखेच्या पोलिसांनी केले आहे.
नागपुरात ऑनलाईन दारू खरेदीतून दोघांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 8:12 PM