लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार जिल्ह्याच्या वितरणाचे हक्क देण्याची बतावणी करून मुंबईतील स्पाईक चॉकलेट तसेच कॅण्डी तयार करणाऱ्या कंपनी मालक आणि व्यवस्थापकाने एका वितरक महिलेला दोन लाख रुपयांचा गंडा घातला. विपुल चेटा (शीतल एन्टरप्रायजेस, डोंबिवली, मुंबई) आणि हाजी अन्सारी (रा. मूर्तिजापूर), अशी आरोपींची नावे आहेत. चेटा हा कंपनीचा मालक असून, अन्सारी विभागीय व्यवस्थापक आहे.तक्रार करणाऱ्या माला दत्ता देशमुख (वय ५२) या हुडकेश्वरमध्ये राहतात. त्यांचे नित्योपयोगी वस्तूंचे दुकान आहे. २ आॅगस्टला अन्सारी देशमुख यांच्या दुकानात गेला. त्याने माला देशमुख यांना आपल्या कंपनीच्या चॉकलेट आणि कॅण्डीच्या वितरणाचे चार जिल्ह्यांचे हक्क (एजन्सी) देण्याची बतावणी केली. त्याबदल्यात चार लाख रुपये अग्रीम राशी जमा करावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार देशमुख यांनी कंपनीच्या खात्यात दोन लाख रुपये जमा केले. तत्पूर्वी कंपनीमालक चेटा याच्यासोबत बोलणीही केली. २ ते १० आॅगस्टदरम्यान हा व्यवहार झाला. त्यानंतर बरेच दिवस होऊनही देशमुख यांना कंपनीकडून माल मिळाला नाही. कंपनी मालक आणि व्यवस्थापक टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे, देशमुख यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चेटा आणि अन्सारीविरुद्ध बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
मुंबईच्या कंपनी मालक, व्यवस्थापकाकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:47 AM
चार जिल्ह्याच्या वितरणाचे हक्क देण्याची बतावणी करून मुंबईतील स्पाईक चॉकलेट तसेच कॅण्डी तयार करणाऱ्या कंपनी मालक आणि व्यवस्थापकाने एका वितरक महिलेला दोन लाख रुपयांचा गंडा घातला. विपुल चेटा (शीतल एन्टरप्रायजेस, डोंबिवली, मुंबई) आणि हाजी अन्सारी (रा. मूर्तिजापूर), अशी आरोपींची नावे आहेत. चेटा हा कंपनीचा मालक असून, अन्सारी विभागीय व्यवस्थापक आहे.
ठळक मुद्देदोन लाखांचा गंडा : मालक, व्यवस्थापकाविरुद्ध हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल