लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लकी ड्रॉ’मध्ये टाटा सफारी लागल्याची बतावणी करीत तरुणाची ४,८०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाचेर (ता. मौदा) येथे नुकतीच घडली.फिर्यादी महेंद्र रमेश सतीकोसरे (२७, रा. चाचेर, ता. मौदा) याच्या मोबाईलवर ९१०९७११८१९ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला आणि त्याला ‘लकी ड्रॉ’मध्ये टाटा सफारी लागली असल्याची संबंधिताने बतावणी केली. त्यासाठी ३,५०० रुपये ७७०७०००१०००००४२० क्रमांकाच्या बँक खात्यात जमा करण्याची सूचना केली. त्याने या खात्यात आधी ३,५०० रुपये व नंतर १,३०० रुपये असे एकूण ४,८०० रुपये जमा केले. त्यानंतर महेंद्रने त्याच क्रमांकावर फोन करून टाटा सफारीबाबत विचारणा केली. संबंधिताने असंबद्ध उत्तरे दिल्याने त्याने बँकेत जमा केलेल्या रकमेची मागणी केली. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेंद्रने पोलिसांत तक्रार नोंदविली. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मनोहर राऊत करीत आहेत.
‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली तरुणाची फसवणूक; टाटा सफारी लागल्याची बतावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 1:59 PM
‘लकी ड्रॉ’मध्ये टाटा सफारी लागल्याची बतावणी करीत तरुणाची ४,८०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाचेर (ता. मौदा) येथे नुकतीच घडली.
ठळक मुद्दे ४,८०० रुपयांची फसवणूक