शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘इव्हेंट शो’ मध्ये पार्टनरशीपचे आमिष दाखवून महिलेने लावला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:45 AM

उपराजधानीसह इतर अनेक शहरांमध्ये लहान-मोठे इव्हेंट प्रोग्राम करणाऱ्या युवकांना पार्टनरशिपचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाºया महिलेचे हळूहळू अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत.

ठळक मुद्देआरोपी महिलांनी अनेकांना फसविले पैसे परत मागितल्यास पोलिसात तक्रार किंवा गुंडांकडून मिळते धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीसह इतर अनेक शहरांमध्ये लहान-मोठे इव्हेंट प्रोग्राम करणाऱ्या युवकांना पार्टनरशिपचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाºया महिलेचे हळूहळू अनेक कारनामे समोर येऊ लागले आहेत. निधी असे आरोपी महिलेचे नाव आहे.एमआयडीसी पोलिसांनीसुद्धा तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिने एका तरुणीला ७५ हजाराने फसवल्याचा आरोप आहे. अगोदर फसवणूक केली आणि नंतर पैसे परत मागितले असता गुंडांकडून धमकावल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी २९ वर्षीय युवती एमआयडीसी परिसरातील निर्जन परिसरातून आरोपी महिलांनी पाठवलेल्या गुंडांच्या तावडीतून सुखरुप पळून जाण्यात यशस्वी ठरली. आरोपी महिला निशी (४५) ही सिव्हील लाईन्स येथील एका महागड्या अपार्टमेंटमध्ये राहते. पीडितेचा आरोप आहे की, महिलेने अनेकांची फसवणूक केल्यानंतरही पोलीस तिच्याविरुद्ध कुठलीही कठोर कारवाई करीत नसल्याने ती सर्रासपणे आपले काम करीत आहे. शहरात होणारे इव्हेंट, चॅरिटी शोमध्ये निधी जाते. तेथूनच इव्हेेंट आॅर्गनायजर आणि शो मध्ये काम करणाºया युवक-युवतींना फिफ्टी-फिफ्टीची पार्टनरशिप देण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढते.फिर्यादी युवती नगमा (बदललेले नाव) आॅगस्ट २०१८ मध्ये व्हीआर ग्रुपकडून रेशीमबाग येथे आयोजित एका चॅरिटी शोमध्ये काम करीत होती. त्या दरम्यान तिची निधीसोबत ओळख झाली. निधीने तिला इव्हेंट शो आयोजित करणे आणि लग्नामध्ये रिटर्न गिफ्ट पॅकेजिंगची आॅर्डर असल्याचे सांगितले. यासाठी फिफ्टी-फिफ्टी पार्टनरशिपमध्ये काम करण्याचे आमिष दाखविले. जानेवारी २०१९ मध्ये नगमाला नागपूरच्या सिव्हील लाईन्स येथील लॉनमध्ये लग्नात गिफ्ट पॅकेजिंगचे दीड लाख रुपयाच्या कामाचे आॅर्डर मिळाले. यासंबंधात निधीशी संपर्क साधल्यास तिने नगमाला फिफ्टी-फिफ्टी पैसे लावण्याचे आमिष दाखवले. निधीने अगोदरच नगमाला गिफ्ट आणि पॅकेजिंगसाठी ७५ हजार रुपये मागितले होते. परंतु लग्नाच्या दिवशी निधी गिफ्ट घेऊन आलीच नाही.ती नगमाचे फोनही उचलत नव्हती. अखेर ६ मे रोजी निधीने फोन उचलला. नगमाने आपले ७५ हजार रुपये परत मागितले, तेव्हा निधीने तिला एमआयडीसीच्या महानंदा दूध डेअरीजवळ सायंकाळी ६.३० वाजता बोलावले. तिथे सायंकाळी ६.४५ वाजता एक पांढºया रंगाच्या कारमध्ये दोन जण आले. त्यांनी नगमाला कारमध्ये बसून निधीकडे चलण्यास सांगितले परंतु नगमाला संशय आल्याने ती आरोपीला झटका देऊन तेथून पळाली. तिच्या तक्रारीवर आरोपी महिला व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.शिवीगाळ करून मारहाणफिर्यादी युवतीजवळ कारने आलेल्या लोकांनी नगमाला निधीला पैसे का मागितले म्हणून शिवीगाळ करीत मारहाण केली. यानंतर पुन्हा पैसे मागितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.पिस्तुलच्या धाकावर लुटमारगिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत राजभवनसमोर २८ फेब्रुवारी रोजी २५ वर्षीय इव्हेंट आॅर्गनायजर विजय जादोन याला पिस्तुलच्या धाकावर आरोपी निधीच्या तीन गुंडांनी धमकावत लुटले होते. विजयनुसार त्याने निधीसोबत पार्टनरशिपमध्ये एक इव्हेंट शो आयोजित केला होता. त्याच्या आॅनलाईन तिकिटांचे सर्व पैसे निधीने आपल्याजवळच ठेवले होते. तिने कलावंत आणि समानाचे जवळपास २२ लाख रुपये ३० डिसेंबरला देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे देण्यास टाळाटाळ करीत राहिली. याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. त्यामुळे निधीने आपल्या गुंडांकडून त्याला धमकावत लुटले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी