उमरेड : सोयाबीनचे बियाणे घेतल्यानंतर लागलीच आधी उगवण क्षमता तपासून घ्या, असे मार्गदर्शन करीत कृषी विभागाच्या वतीने प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकऱ्यांना समजावून सांगितले जात आहे. तालुक्यातील हिवरा येथे सोयाबीन उगवण क्षमता, रासायनिक खताची बचत, बीबीएफ तंत्रज्ञान, गटामार्फत खते खरेदी करण्यासाठीचे मार्गदर्शन करण्यात आले. ‘एक गाव, एक वाण’ असा प्रयोग करण्याचेही आवाहन यावेळी कृषी विभागाच्या वतीने केल्या गेले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी एन.टी.देशमुख, कृषी सहायक एस.टी.घारे, उपसरपंच विलास डोये, माजी उपसरपंच बेबीनंदा गिरसावळे आदींची उपस्थिती होती. वासुदेव मोंढे, गंगाधर खोंडे, गुलाब सेलोटे, यादव पानबुडे, राजू शेरकी, नथ्थूजी सोनवाणे, बाळकृष्ण खोंडे, भास्कर सोनवाणे, रोशन खोंडे, कुणाल मुळे, रोशन सेलोटे आदींनी सहकार्य केले.
---
तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी सोयाबीन उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक करून दाखविताना.