लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने निर्बंध सुरू केले आहे. हीच संधी साधून अज्ञात चाेरट्याने बंद बारमधील २ लाख ४६,१०० रुपये किमतीची विविध कंपन्यांची विदेशी दारू व साहित्य असा अडीच लाख रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना रविवारी (दि.२१) सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
अश्विन वाल्मिक कावरे (३९, रा.माॅ वैष्णवी अपार्टमेंट, उमरेड) यांचा गिरडकर ले-आऊटमध्ये गाेकुल रेस्टाॅरंट व बार आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे बार बंद केला, तसेच शासकीय आदेशानुसार शनिवारी लाॅकडाऊनमुळे त्यांनी बार बंद ठेवला हाेता. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने डाव साधत बंद बारचे शटर ताेडून आत प्रवेश केला. बारमधील विविध कंपन्यांची विदेशी दारू किंमत २ लाख ४६ हजार १०० रुपये, तसेच तीन हजार रुपयांची डीव्हीआर मशीन, सहा हजार रुपये किमतीचे दाेन कूलर असा एकूण २ लाख ५५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पाेबारा केला. रविवारी सकाळी बारचे मॅनेजर बारकडे आले असता, त्यांना बारचे शटर तुटलेले आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक राजेश पाटील करीत आहेत.