लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरी ऑरेंज आणि अॅक्वा लाईन मार्गावरील मेट्रो स्टेशन अनलॉक होण्यास सज्ज झाले आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी शहरामध्ये ऐतिहासिक महत्त्व वाढविण्यासोबतच प्राचीन वारसा जपण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने स्टेशनचे निर्माण कार्य सुरू आहे.ऑरेंज लाईन मार्गवरील छत्रपती मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरू असून आतापर्यंत ७५ टक्के पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने वर्धा मार्गावरील छत्रपती चौकाचे आाणि उड्डाण पुलाचे नामाकरण छत्रपती उड्डाण पूल या नावाने केले होते. आता डबल डेकर मेट्रो पुलाचे निर्माण कार्य या ठिकाणी झाले असून छत्रपती चौकाच्या नावाने निर्माण होऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे स्थानकाचे डिझाईन शिवरायाच्या सर्वात महत्त्वपूर्ण किल्ला ‘रायगड’च्या धर्तीवर बनविण्यात आले असून लोकांना प्राचीन काळापासून ते आधुनिक युगापर्यंतच्या आठवणींना अविस्मरणीय नक्कीच करणार आहे.
रायगड किल्ल्याच्या धर्तीवर छत्रपती चौक मेट्रो स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 9:02 PM
कोरोना संसर्गामुळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरी ऑरेंज आणि अॅक्वा लाईन मार्गावरील मेट्रो स्टेशन अनलॉक होण्यास सज्ज झाले आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी शहरामध्ये ऐतिहासिक महत्त्व वाढविण्यासोबतच प्राचीन वारसा जपण्याचा निर्णय घेतला.
ठळक मुद्देस्टेशनचे निर्माण कार्य पूर्णत्वाकडे : ऐतिहासिक वारसा जपण्याचा निर्णय