शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

By admin | Published: February 20, 2016 3:28 AM

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा नागपुरात मोठ्या उत्साहात पार पडला. गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध संघटनांतर्फे माल्यार्पण करण्यात आले.

शिवजयंती उत्साहात साजरी : सत्कार, माल्यार्पण, रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजननागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा नागपुरात मोठ्या उत्साहात पार पडला. गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विविध संघटनांतर्फे माल्यार्पण करण्यात आले. यावेळी ढोल-ताशा, लेझीम पथकांनी आकर्षक कवायती सादर केल्या. काही ठिकाणी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. भगव्या पताका घेऊन युवकांनी उत्स्फूर्तपणे रॅली काढल्या. सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज की जय असाच गजर होत होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महालस्थित त्यांच्या पूर्णाकृती पुतळयाला आमदार प्रकाश गजभिये यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार दीनानाथ पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, ईश्वर बाळबुधे, विजय गजभिये, भूपेंद्र सनेश्वर, अजय मेश्राम, अविनाश तिरपुडे, गोपी आंभोरे, संदीप मेंढे, दुर्गादास केवलरामानी, संदीप शाहू, बलराम आडे, श्याम मेश्राम, जेहरूभाई, नरेश ढगे, दयाराम पराते आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपायुक्त (सामान्य) आप्पासाहेब धुळाज, उपायुक्त (नियोजन) मिलिंद सारंगे, लेखाधिकारी नलिनी कांबळे, तहसीलदार मुंदडा, प्रशांत पाटील, हरीश टेंभरे, वलय पांडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी भगत, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी, प्रकाश पाटील, अनिता मेश्राम, मनीषा गजभिये, शैलेश मेश्राम, मनोहर राऊत, निशिकांत सुके, प्रियदर्शनी वाटेकर उपस्थित होते.नागपूर शहर काँग्रेस कमिटीनागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गांधी गेट येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री अनिस अहमद, राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, कमलेश समर्थ, सुभाष खोडे, राजेश कडू, विजय बाभरे, अतुल कोटेचा, रत्नाकर जयपूरकर, दिलीप ठाणेकर, अजय हिवरकर, नगरसेवक तनवीर अहमद, महेश श्रीवास, पंकज निघोट, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, युवक क ाँग्रेसचे बंटी शेळके उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. नागपूर सुधार प्रन्यास प्रन्यासतर्फे छत्रपती शिवाजी सभागृहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता सुनील गुज्जेलवार यांनी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता सूचक, नीलिमा पाटणे, गीते, भुरले, जयसंपर्क अधिकारी विजू बोरकर व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मराठा विद्या प्रसारक समाजसंघटनेतर्फे तीन दिवसीय शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कबड्डी व कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. दीपाली घोंगे हिने राजमाता जिजाऊ एकपात्री प्रयोग सादर केला. यादव गुजर यांचे शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान झाले. मल्हार ग्रुपतर्फे मराठमोळ्या संगीताचा व शिवराज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन केले होते. त्याचबरोबर शिवचरित्रावर आधारित चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नि:शुल्क रोगनिदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. शिवजयंतीच्या दिवशी सकाळी महिला व युवकांची रॅली काढण्यात आली. दुपारी भव्य शोभायात्रेने महोत्सवाची सांगता झाली. युवक काँग्रेसयुवक काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना रक्तदानाद्वारे आदरांजली देण्यात आली. कलासागर चित्रकला महाविद्यालयाच्या चित्रकारांच्याद्वारे महाल येथील गांधीगेटजवळ महाराजांच्या प्रतिमेसमोर शिवचरित्र रेखाटण्यात आले. १०७ रक्तदात्यांनी शासकीय रक्तपेढीत रक्तदान के ले. यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके, गोपाल पट्टम, आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, दीनानाथ पडोळे, प्रज्ञा बडवाईक, हेमंत गडकरी, मनीषा पापडकर, कुणाल पुरी, प्रशांत तन्नेरवार, नीतेश गुरनानी, अलोक कोंडापुरवार, श्रीकांत ढोलके, राकेश निकोसे, शालिनी ढोलके, रोहित खैरवार, नीलेश देशभ्रतार, हेमंत कातुरे, नावेद शेख, फजलुर रहमान कुरैशी, शेख अजहर, मोतीराम मोहाडीकर, सुमित भालेकर, अंकित रोकडे, स्वप्निल बावनकर आदी उपस्थित होते. राजा शिव छत्रपती प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. अभय ठाकरे स्मृती महाराष्ट्राची लोकधारा सादरीकरण कार्यक्रमात विविध शाळांनी गोंधळ नृत्य सादर केले. यानंतर शहरातील काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दिल्ली येथे प्रथम क्रमांक प्राप्त करणारे सोंगी मुखवटे या नृत्य पथकातील २२ शाळांचाही गौरव झाला. कार्यक्रमाला आमदार विकास कुंभारे, गिरीश व्यास, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, राजे मुधोजी भोसले, दीनानाथ पडोळे, बंडू राऊत, प्रभा जगनाडे, राजेश घोडपागे, नगरसेविका हर्षला साबळे, रश्मी फडणवीस, जयप्रकाश गुप्ता, प्रज्ञा बडवाईक उपस्थित होते. प्रास्ताविक मिलिंद येवले, संचालन रोहिणी मोहरील व आभार डॉ. हंबीरराव मोहिते यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गांधीगेट येथील पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मनसेतर्फे गौरवगाथेच्या छोटेखानी पुस्तकाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रशांत निकम, विशाल बडगे, घनश्याम निखाडे, अरुण मौंदेकर, अशोक बगमारे, श्याम पुनियानी, मनिषा पापडकर, शशांक गिरडे, श्रीकांत निकम, सुमित वानखेडे, निशांत चव्हाण, अरविंद सावरकर, आशिष पांढरे, अतुल गायकवाड, राजेंद्र पुराणिक, अमित अन्नपूर्णे, शुभम तिळगुळे, अभय व्यवहारे आदी उपस्थित होते. मानव विकास सामजिक संस्था गिट्टीखदान चौकात महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. पांडुरंग गजभिये यांच्याहस्ते महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी राकेश डोहारे, चंदनसिंग ठाकुर, आशिष गजभिये, सज्जन नगरारे, प्रणय उरकुडे, रामू खोब्रागडे, सुबोध वासनिक, प्रभात यादव, स्वरभ पवार, अमित चौधरी, शशांक धोटे, राहुल दंडे, प्रवीण भोयर आदी उपस्थित होते. शिवसेना ओंकारनगर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शाम चौधरी यांच्याहस्ते महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी नरेंद्र आगलावे, अतुल साठवणे, प्रवीण कुंभलकर, नरेंद्र आगलावे, शैलेश मानकर, संदीप बोंद्रे, जितेंद्र भंगाळे, अमोलसिंग बैस, दर्शन जावळे, निशांत टुले, सुधीर दुबे, अतुल साठवणे आदी उपस्थित होते. सेंट्रल इंडिया ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन संस्थेतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ. अनिस अहमद उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना महाराजांच्या विचारांशी अवगत करून दिले. कार्यक्रमाचे संचालन कुणाल शाहू यांनी केले. यावेळी संस्थेचे प्राचार्य विनय मानकर, मोहम्मद बाबर, सलीम उपस्थित होते. एनएसव्हीएम फुलवारी शाळावैशाली नगर येथील फुलवारी शाळेत महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनचरित्र नाटकांच्या माध्यमातून उलगडले. मुरलीधर पवनीकर यांनी महाराजांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मनोज डाहे, मनिषा सरोदे, शशीकांत बंड आदी उपस्थित होते. नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीगांधी गेट, महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश गजभिये, प्रवीण कुंटे, दीनानाथ पडोळे, अनिल अहिरकर, ईश्वर बाळबुधे, प्रशांत बनकर, चरणजितसिंग चौधरी, दिनेश त्रिवेदी, अशोक अडकीने, संजय शेवाळे, दिनकर वानखेडे, सुखदेव वंजारी, रेखा कृपाले, श्रद्धा साहू, रत्नमाला उमरेडकर, संगीता खोब्रागडे, ज्योती लिंगायत, आशा बोढेले, रिजवान अन्सारी, अ‍ॅड. प्रकाश जीवतोडे, राजेश माकडे, रविंद्रसिंग मुल्ला, आशिष नाईक आदी उपस्थित होते. विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थाअजनी येथे पतसंस्थेच्या कार्यालयात शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संजय वानखेडे, कार्यकारी अभियंता यांनी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी कार्यकारी अभियंता इंगळे, कटकमवार, संस्थेचे अध्यक्ष संजय खोडे, ज्ञानेश्वर महल्ले व कर्मचारी उपस्थित होते. शेषनाग शिव आघाडी सेना महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन साईबाबानगर, पूर्व शांतीनगर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला सेनेचे अध्यक्ष सुनील वाघमारे, रवी हारगुडे, प्रशांत मुडे, गोलू दुर्गे, बळीराम बांते, योगेश वाघमारे, तेजस झाडे, अश्विन कोहाड, अमोल देव्हारे आदी उपस्थित होते.