शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

छत्रपती शिवाजी महाराजांंची युद्धनीती म्हणजेच युद्धमंत्र : राहुल सोलापूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 10:57 PM

छत्रपती शिवाजी महाराजांनी योजिलेल्या सर्व क्लृप्त्या म्हणजे युद्धनीतीचा एक मंत्रच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता आणि शिवव्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देलोकमत आणि राणी दुर्गा उत्सव मंडळाचा ‘नागपूर दुर्गा महोत्सव’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : युद्धनीती शिकविली जाऊ शकते, याची जाणीव लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये जगभरातील सैनिकांना दिल्या जात असलेल्या शिक्षणावरून झाली. आपल्याकडे मात्र, त्याबाबत बरीच उदासीनता आहे. लंडन आणि न्यूयॉर्क येथील ‘वॉर म्युझियम’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाशी दिलेल्या झुंजीला सर्वोत्तम स्थान देऊन, त्याचा अभ्यास केला जातो. या युद्धात महाराजांनी योजिलेल्या सर्व क्लृप्त्या म्हणजे युद्धनीतीचा एक मंत्रच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता आणि शिवव्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे केले.लोकमत आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने पूर्व लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल पटांगणात आयोजित ‘नागपूर दुर्गा महोत्सव २०१९’मध्ये बुधवारी सोलापूरकर यांनी ‘प्रतापगड : एक मंत्रयुद्ध’ या विषयावरील व्याख्यान गुंफले. यावेळी, मंडळाचे अध्यक्ष प्रसन्ना मोहिले उपस्थित होते.शिवरायांचे गुरु कोण, हा प्रश्न उपस्थित करत, वर्तमानात सुरू असलेल्या वादावर त्यांनी आपले अभ्यासपूर्ण विवेचन केले. संत तुकाराम की समर्थ रामदास, यापैकी कोण गुरु, या वादात गुरफटण्यापेक्षा तुकाराम व रामदास यांच्यामधे असलेले शिवराय, अशा त्रिवेणी संगमातूनच स्वराज्याचा जन्म झाला, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल, असे सोलापूरकर यावेळी म्हणाले. स्वराज्याच्या २४ पट असलेली आदिलशाही आणि आदिलशाहीच्या ३१ पट असलेल्या मोगलांसोबत शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्त्व महाराजांच्या युद्धनीतीमध्ये दडले आहे. प्रचंड फौजेनिशी अफजल जेव्हा स्वराज्यावर चालून आला आणि स्वराज्याची राखरांगोळी केली. तुळजापूरची भवानी फोडली, पंढरपूर बाटवले. मात्र, अशा परिस्थितीत महाराजांनी कच खाल्ली नाही. प्रचंड संयम बाळगला आणि मावळ्यांचे मनोधैर्य खचू दिले नाही. उलट, अशा काळात त्यांनी शाहिस्तेखान आणि अफजल खानामध्ये सौम्य वितुष्ट निर्माण करत, त्यांनाच त्यांच्यात गुरफटत ठेवले. त्याचा लाभ आक्रमणामुळे निर्माण झालेल्या भीतीला सावरण्यात घेतला आणि अफजलला आपल्या कैचीत पकडून त्याचा नायनाट केला. या संपूर्ण अभ्यासात महाराजांनी प्रचंड धैर्य बाळगून भविष्यासाठी मंत्रयुद्धाची नांदीच दिल्याचे राहुल सोलापूरकर यावेळी म्हणाले.चिमुकल्या स्पर्धकांना पुरस्कारांचे वितरणमंगळवारी पार पडलेल्या सांस्कृतिक स्पर्धांच्या विजेत्यांना राहुल सोलापूरकर व रेणुका मोहिले यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. त्यात आरोही गान, स्निग्धा वाघमारे, मिहीर जैस्वाल, रिया राणे, प्रशंसा, स्वराली कुळकर्णी, नव्या महाजन, माही भांबलकर, वरालिका गांजापुरे, आर्या जलतारे, साकेत ठाणेकर, अनन्या पंडित, अत्रेयू कजगीकर, श्रेया समृतवार, सानिया चक्रवर्ती, अनिका बॅनर्जी, पूर्वा मानकर यांचा समावेश होता. तर, लक्ष्मीनगर गु्रप डान्स व सुपर गर्ल्स यांनाही यावेळी पुरस्कृत करण्यात आले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजwarयुद्ध