नागपूर : शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या प्रमुख ग्रंथपाल विभा डांगे यांना वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या समारंभात शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले. ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय ॲट द रेट ऑफ नागपूर’ या कार्यक्रमांतर्गत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. डांगे यांनी शासकीय सेवेत आठ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत चंद्रपूर व गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात ‘ग्रंथालय अधिकारी’ म्हणून सक्षमतेने काम केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मदत व्हावी म्हणून गडचिरोली येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या शासकीय इमारतीच्या निर्मितीसाठी त्यांचे योगदान आहे. ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, सहायक ग्रंथालय संचालक मीनाक्षी कांबळे तसेच उच्च शिक्षण विभाग, तंत्रशिक्षण विभाग व शासकीय ग्रंथालयाचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
प्रमुख ग्रंथपाल विभा डांगे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:07 AM