शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मुख्यमंत्री ते माजी मुख्यमंत्री, कार्यकर्त्यांचा जोश कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 10:40 AM

२०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरात त्यांचे जल्लोषात स्वागत झाले होते व अवघ्या नागपूरने ते अनुभवले होते. पाच वर्षांनंतर ते माजी मुख्यमंत्री झाले असले तरी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील विश्वास कायम आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत ढोलताशांचा गजरफटाक्यांची आतषबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ते येणार...ते बोलणार म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यात प्रतीक्षा होती. अनेकांच्या हाती झेंडे तर बहुतांश जणाच्या तोंडी त्यांचेच नाव. ढोलताशांचा गजर अन् त्यात समर्थनाच्या घोषणा. महिला असो, पुरुष असो किंवा ज्येष्ठ नागरिक, प्रत्येकाची ऊर्जा समानच. अखेर ते आले अन् संपूर्ण परिसराने पाच वर्षांअगोदरचे दृश्य अक्षरश: त्याच पद्धतीने अनुभवले. तीच गर्दी, तोच उत्साह अन् तेच भारलेले वातावरण.२०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरात त्यांचे जल्लोषात स्वागत झाले होते व अवघ्या नागपूरने ते अनुभवले होते. पाच वर्षांनंतर ते माजी मुख्यमंत्री झाले असले तरी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील विश्वास कायम आहे.त्यामुळेच विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांचे उपराजधानीत आगमन झाल्यानंतर २०१४ च्याच ऊर्जेत रविवारी कार्यकर्त्यांनी दणक्यात स्वागत केले. फडणवीस यांच्या आगमनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ढोलताशाचा गजर व फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली. मागील काही दिवसापासून मुंबई राजकारणाचे केंद्र बनले होते. रविवारी फडणवीस यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर ते सायंकाळी नागपूरकडे रवाना झाले. ८.४५ च्या सुमारास त्यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते पोहोचले होते. माजी मुख्यमंत्री विमानतळाहून बाहेर पडताच त्यांनी सर्वांचे हात हलवून अभिवादन केले. कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. अगदी गाडीत बसल्यानंतरदेखील कार्यकर्ते त्यांना पाहण्यासाठी समोर आले होते. ‘भारत माता की जय’ चे नारे कार्यकर्ते लावत होते. ताफा निघाल्यावर सुमारे १०० ते २०० मीटरपर्यंत कार्यकर्ते स्वागतासाठी उभेच होते. याचदरम्यान आतषबाजीदेखील करण्यात आली. यावेळी राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री व विधान परिषद आमदार डॉ.परिणय फुके, महापौर संदीप जोशी, भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा कोठे, माजी आमदार मिलिंद माने, माजी महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच अर्चना डेहनकर, अशोक मेंढे, संदीप जाधव, महामंत्री किशोर पलांदूरकर, मुन्ना यादव, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहणे, रमेश भंडारी, बंडू राऊत, संजय ठाकरे, किशन गावंडे, शिवानी दाणी, चेतना टांक, डॉ कीर्तिदा अजमेरा, प्रभाकर येवले, भूषण शिंगणे, दिलीप चौधरी, नागेश सहारे, किशोर वानखेड़े, अमर पारधी, रूपा राय, परशु ठाकूर,धर्मपाल मेश्राम, मनिषा काशीकर,अभय दीक्षित, दीपराज पार्डीकर, वर्षा ठाकरे, चंदन गोस्वामी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेदेखील स्वागतासाठी एकत्रित आले होते.बाहेरगावाहूनदेखील आले कार्यकर्तेदेवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यासाठी केवळ नागपूर शहर व जिल्हाच नव्हे तर बाहेरील जिल्ह्यातूनदेखील पदाधिकारी व कार्यकर्ते पोहोचले होते. भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते सायंकाळीच विमानतळावर पोहोचले होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस