लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुढीपाडवा नूतन संवत्सरारंभ तसेच रामनवरात्रारंभ. हा दिवस अत्यंत शुभ असून साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत रविवारी नागपुरातील रामगिरी या शासकीय निवासस्थानी गुढी उभारली. यावेळी त्यांनी राज्यात सर्वच क्षेत्रात प्रगतीचा संकल्प केला. राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी उभारली नागपुरात गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 14:01 IST