शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

मुख्यमंत्री लागले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 9:33 PM

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला मिळालेल्या प्रचंड यशाने उत्साहित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. नागपुरातील आपल्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे त्यांनी त्यांचे विधानसभा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या बूथनिहाय मतदानाचा आढावा घेतला. कमजोर असलेले बूथ मजबूत करण्याच्या सूचना करीत पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देदक्षिण-पश्चिम नागपुरातील बूथनिहाय मतांचा घेतला आढावाकमजोर बूथ मजबूत करण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला मिळालेल्या प्रचंड यशाने उत्साहित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. नागपुरातील आपल्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे त्यांनी त्यांचे विधानसभा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या बूथनिहाय मतदानाचा आढावा घेतला. कमजोर असलेले बूथ मजबूत करण्याच्या सूचना करीत पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.या बैठकीत महापौर नंदा जिचकार, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष किशोर वानखेडे यांच्यासह दक्षिण-पश्चिममधील पक्षाचे सर्व पदधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना १ लाख २० हजार १८५ मते मिळाली. काँग्रेसचे नाना पटोले यांना ६५,०६९ मते मिळाली. गडकरी यांना येथून ५५,११६ मतांची आघाडी मिळाली, हे विशेष. वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांना येथून ६०६५ आणि बसपाच्या मो. जमाल यांना ५९६२ मते मिळाली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी सकाळी ९ वाजता मतदारसंघातील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यांनी सर्वात अगोदर पदाधिकारी व नगरसेवकांचे अभिनंदन केले. यानंतर प्रत्येक बूथची माहिती घेतली. दलितबहुल भागातील बूथवर पक्षाला कमी मतदान झाल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. अशा सर्व बृथवर जनसंपर्क आणखी वाढवून ते मजबूत करण्याचे निर्देश दिले.बैठकीत कामगार महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, नरसेवक राजू हडप, लक्ष्मी यादव, विजय चुटीले, लखन येरावार, मीनाक्षी तेलगोटे आदी उपस्थित होते.नवीन मतदारांवर अधिक भरमुख्यमंत्री फडणवीस यांनी काही बूथवर पक्षाला अपेक्षित मते न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा बूथवरील नवीन मतदारांना जोडण्यावर भर देण्यास सांगितले. पदाधिकारी आणि नगरसेवकांना आपापल्या परिसरातील नवीन मतदारांच्या नोंदणीकडे लक्ष देण्यास सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्या, असेही सांगितले.

 

 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक