जनता दरबार हाऊसफुल्ल : नागरिकांचे प्रश्न ऐकले, निवेदने स्वीकारलीनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी हैद्राबाद हाऊस येथे १५०० सामान्य नागरिकांची गाऱ्हाणी ऐकली तसेच निवेदने स्वीकारलीत. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास कुंभारे, महापौर प्रवीण दटके, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्रचे मुख्य अभियंता सुनील गुज्जेलवार, विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके हे होते.निवेदने देणाऱ्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा प्रिंपी येथील शहीदस्मारक, दिग्रस येथील नागरिक, मेहतर समाज, सुशिक्षित बेरोजगार, प्रकल्पग्रस्त, सोनी समाज मित्रमंडळ, माजी सैनिक, गोसेखुर्द, मिहान प्रकल्पग्रस्त या व इतर संस्था, संघटनांचे प्रतिनिधी व नगरसेविका चेतना टांक, मुन्ना महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.सोनी समाज मित्र मंडळाच्या शिष्टमंडळाने संत नरहरी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी केली. मनोरुग्णालय परिसरातील जमीन भाडेपट्टीवर देण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. सुशिक्षित बेरोजगारांची एका कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली. धरमपेठ येथील अवैध अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. माजी सैनिकांनी मालमत्ता करात सूट मिळण्याबाबत निवेदन दिले.(प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांनी तीन तास ऐकली जनतेची गाऱ्हाणी नागपुरातील नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या पार्कमध्ये संरक्षक भिंत नसल्यामुळे जनावरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. त्याचा त्रास पार्कमध्ये फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना होत असल्यामुळे सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी एका ज्येष्ठ नागरिकाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
मुख्यमंत्र्यांनी केले समाधान
By admin | Published: December 27, 2015 3:18 AM