उमरेड : मित्रांसाेबत खेळण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना उमरेड शहरातील बीपीएड काॅलेज तलाव परिसरात रविवारी (दि.१८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
धन्नात्रय शिवाजी पायदलवार (१६, रा. माेहाेड ले-आऊट, उमरेड) असे मृत मुलाचे नाव आहे. धन्नात्रय हा विनू व इतर मित्रांसाेबत खेळण्यासाठी म्हणून बीपीएड काॅलेज तलाव परिसरात गेला हाेता. तलावात खेळत असताना ताे खाेल पाण्यात बुडाला. ही बाब लक्षात येताच तेथील नागरिकांनी त्याला तलावाबाहेर काढले. लगेच त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी शिवाजी कचरू पायदलवार (५२, रा. माेहाेड ले-आऊट, उमरेड) यांच्या तक्रारीवरून उमरेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस नाईक मनाेज वाघ करीत आहेत.