आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात आदिवासी भागात दरवर्षी बालमृत्यू होत असतानादेखील यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर विविध आजारांमुळे झाले असल्याचा दावा राज्य शासनातर्फे करण्यात आला आहे. विधानपरिषदेत किरण पावसकर, हेमंत टकले, नरेंद्र पाटील इत्यादी सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकाºयांची ३५२ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे मुख्य सेविकांची ७१५, अंगणवाडी सेविकांची १,६२०, मिनी अंगणवाडी सेविकांची १,३३९ आणि मदतनीसांची ५,१७२ पदे रिक्त आहेत, अशी माहितीदेखील देण्यात आली. बालविकास अधिकाºयांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र सादर करण्यात आले आहे.
राज्यातील बालमृत्यू कुपोषणामुळे नाहीच; महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 7:27 PM
राज्यात आदिवासी भागात दरवर्षी बालमृत्यू होत असतानादेखील यातील एकही मृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर विविध आजारांमुळे झाले असल्याचा दावा राज्य शासनातर्फे करण्यात आला आहे.
ठळक मुद्देबालविकास योजना कशी होणार पूर्णबालमृत्यूंमागे आजारपणांचे कारण