शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

मनपा शाळांत राबविणार बाल स्वच्छता मोहीम

By admin | Published: November 13, 2014 12:55 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत के स्वच्छ विद्यालय मोहीम सुरू केली आहे. शाळा हे शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याने बालकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पालक

१४ ते १९ दरम्यान विविध कार्यक्र म : सेवाभावी संस्थांचे सहकार्यनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत के स्वच्छ विद्यालय मोहीम सुरू केली आहे. शाळा हे शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याने बालकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पालक व समाजापर्यंत पोहोचावा, यासाठी राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान शाळांतून बाल स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार महापालिका शाळांतून ही मोहीम प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती शिक्षण सभापती चेतना टांक यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. १४ नोव्हेंबर या बालक दिनापासून मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. यानिमित्ताने आठवडाभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात स्वच्छ शाळा व स्वच्छ परिसर, स्वच्छ व संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ शौचालय उपक्रमांचा समावेश आहे.जनजागृती व्हावी यासाठी पथनाट्य, प्रभातफेरी, घनकचरा व्यवस्थापन आदी उपक्र म राबविण्यात येणार आहे. शासनाचे आदेश म्हणून नव्हे तर शालेय विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा, यासाठी महापौर प्रवीण दटके यांनी बैठक घेतली. स्वच्छ शाळेला महापौर चषक प्रदान केला जाणार असून, ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहे. शाळांमध्ये अस्वच्छता होणार नाही, यासाठी मुख्याध्यापकांनी सतर्क राहण्याचे आदेश आयुक्त श्याम वर्धने यांनी दिले आहे. मनपाच्या २८ माध्यमिक व १६६ प्राथमिक शाळांतून ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेला जेसीआय आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे सहकार्य लाभणार आहे. मोहीम संपल्यानंतर दर १५ दिवसांनी शाळांना भेट देण्याची सूचना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी बैठकीत केली. विद्यार्थ्यांना जेसीआय व ग्रीन व्हिजिल व्याख्यान व पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणार. तसेच मनपाच्या आरोग्य विभागातर्फे घर स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. पत्रपरिषदेला परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, डॉ. कविता रतन यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)