कनिष्का राठोड, शुभम साल्पे प्रथम : ‘ब्रेन जनजागृती सप्ताह’चा सहावा दिवसनागपूर : ‘आमचा मेंदू आमचे भविष्य’ या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेला भरारी देत एकाहून एक सुंदर चित्रे रेखाटली. दोन गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ‘अ’ गटातून कनिष्का राठोड तर ‘ब’गटातून शुभम साल्पे याने प्रथम स्थान पटकाविले.इंडियन अकॅडमी आॅफ न्युरॉलॉजीच्यावतीने मेंदू दिनानिमित्त आयोजित ‘ब्रेन जनजागृती सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या सहाव्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. लक्ष्मीनगर येथील सीस्फा आर्ट गॅलरीमध्ये रविवारी सकाळी ९ वाजतापासून स्पर्धेला सुरुवात झाली. तब्बल ६५ शाळांच्या विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. बाहेर पाऊस कोसळत होता तर सभागृहाच्या आत विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. स्पर्धेचा विषय, विद्यार्थ्यांना एका वेगळ्या विश्वात घेऊन गेला. स्पर्धेचे पुरस्कार वितरणाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, इंडियन अकादमी आॅफ न्युरॉलॉजीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम, बसोली ग्रुपचे संस्थापक चंद्रकांत चन्ने व परीक्षकांच्या भूमिकेत असलेले प्रसिद्ध चित्रकार प्रा. प्रमोदबाबू रामटेके आणि बाबर शरीफ उपस्थित होते. प्रास्ताविक चन्ने यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थित पाहुण्यांचा परिचय आणि चित्रकला स्पर्धेतील विषयावर मार्गदर्शन केले. प्रतिभेला साधनेची गरज आहे. यामुळे ती करीत रहा, असे आवाहन गिरीश गांधी यांनी केले. संचालन मंगेश बावसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसोली ग्रुपने विशेष परिश्रम घेतले. या जनजागृती सप्ताहाला नागपूर न्यूरो सोसायटी, इंडियन सायकॅट्रीस सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेस, नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि बसोली ग्रुपचे सहकार्य मिळाले आहे. (प्रतिनिधी)विजेत्यांची नावे‘अ’ गटप्रथम -कनिष्का राठोड (मिलेनियम स्कूल)द्वितीय - वरण्यम् जोशी (भवन्स, आष्टी)तृतीय - भूमिका मित्तल (सेंट्रल पॉर्इंट स्कूल)उत्तेजनार्थ - इंद्रायणी तायडे (सोमलवार निकालस हायस्कूल)उत्तेजनार्थ - दीक्षा पांडे (संस्कार विद्यासागर हायस्कूल)‘ब’ गटप्रथम - शुभम साल्पे (पं. बच्छराज व्यास विद्यालय)द्वितीय - आदित्य बावने (हडस हायस्कूल)तृतीय - मो. हरीश शेख ( सेंट जॉन्स हायस्कूल)उत्तेजनार्थ - आयुष तटवार (भवन्स स्कूल)उत्तेजनार्थ - राजश्री ठाकरे (नारायणा विद्यालय)
मुलांनी साकारला भविष्यातील मेंदू !
By admin | Published: July 28, 2014 1:30 AM