शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

Nagpur: मुलांचा वाद ठाण्यात पोहोचला, मुन्ना यादवने घातला राडा, ‘डीसीपी’ला धक्काबुक्की केल्याने घेतले ताब्यात

By दयानंद पाईकराव | Published: October 06, 2024 12:09 AM

Nagpur Crime News: राज्य बांधकाम मंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप नेते मुन्ना यादव आणि त्यांचा भाऊ बाला यादव यांच्यातील आपसी वादाने शनिवारी रात्री पुन्हा डोके वर काढले. दोन गटांत झालेल्या भीषण हाणामारीत चार जण जखमी झाले.

नागपूर - राज्य बांधकाम मंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप नेते मुन्ना यादव आणि त्यांचा भाऊ बाला यादव यांच्यातील आपसी वादाने शनिवारी रात्री पुन्हा डोके वर काढले. दोन गटांत झालेल्या भीषण हाणामारीत चार जण जखमी झाले. यातील एका जखमीला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान उपायुक्त दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्यामुळे पोलिसांनी मुन्ना यादव यांना उशिरा रात्री ताब्यात घेतले. परंतु वरिष्ठ पातळीवरून गुन्हा दाखल न करण्याचे आदेश मिळाल्यामुळे पोलिसांनी मुन्ना यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री मुन्ना यादवची मुले करण आणि अर्जुन घराजवळ असलेल्या देवीच्या मंडपाजवळ उभे होते. तेवढ्यात बाला यादवची मुले आपल्या साथीदारांसह तेथे आली. त्यांनी करण आणि अर्जुनला मारहाण केली. त्यानंतर करण आणि अर्जुन आपल्या समर्थकांसह बाला यादवच्या घरी गेले. तेथे त्यांनी बाला यादवच्या मुलांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांनी एकमेकांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली. थोड्या वेळात धंतोली पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेऊन धंतोली ठाण्यात आणले. काही वेळातच मुन्ना यादव यांचे भाजपातील समर्थक आणि बाला यादव यांचे समर्थक धंतोली ठाण्यात पोहोचले. धंतोली ठाण्यातही दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ करून भांडण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करूनही कोणीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेवढ्यात झोन २ चे पोलिस उपायुक्त राहुल मदने धंतोली पोलिस ठाण्यात पोहोचले. दरम्यान मुन्ना यादवने पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्याशी वाद घातला. त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. यामुळे पोलिसांनी मुन्ना यादवला ताब्यात घेतले. ‘डीसीपी’ मदने यांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची सूचना धंतोली पोलिसांना केली. दरम्यान आपसात झालेल्या मारहाणीत एका जखमीला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत धंतोली पोलिस या प्रकरणाचा तपास करीत होते. पोलिस अधिकाऱ्यांमध्ये संतापमुन्ना यादव यांनी डीसीपी मदने यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान मुन्ना यादव विरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये यासाठी एका भाजप आमदाराने पोलिसांवर दबाव टाकला. काही वेळातच वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणी गुन्हा न दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. त्यामुळे मुन्ना यादव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे. यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलिस उपायुक्त मदने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरू असून सध्या काहीच सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर