शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

कचरागाडीने घेतला बालकाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 10:57 PM

Accident, child deathचारवर्षीय बालक त्याच्या घरासमोर खेळत असताना नगर परिषदेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने त्याला जोरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्या बालकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या कामठी शहरातील घटना : घरासमोर खेळताना दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कामठी) : चारवर्षीय बालक त्याच्या घरासमोर खेळत असताना नगर परिषदेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने त्याला जोरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्या बालकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कामठी शहरात सोमवारी (दि. १२) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.इशू ऊर्फ लक्ष्य नीलेश बरसे (४, रा. गौतम नगर, छावणी, कामठी) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. नगर परिषद प्रशासनाने शहरातील कचरा संकलनासाठी वाहनांची व्यवस्था केली आहे. इशू सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्याच्या घरासमोर समवयस्क मुलांसोबत खेळत होता. काही कळण्याच्या आत वेगात आलेल्या एमएच-४०/बीएल-७३२५ क्रमांकाच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनाने इशूला जोरात धडक दिली.त्यात गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबीयांनी त्याला लगेच शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासणीअंती मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व वाहन जप्त केले. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल चमेले करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू