शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

चिनी मिरची व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 9:43 PM

चीन येथील मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले. हुआंग हॅन (४१) असे या व्यापाऱ्याचे नाव असून तो मागील काही दिवसांपासून उमरेड येथील डी मर्सी हॉटेलमध्ये कमरा नंबर २०८ मध्ये मुक्कामी होता. या घटनेनंतर उमरेड पालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

ठळक मुद्देपालिकेच्या आरोग्य विभागाने बाळगली सतर्कता : डिसेंबरपासून वेगवेगळ्या भागात भारतभ्रमंती

अभय लांजेवार/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (उमरेड ): चीन येथील मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले. हुआंग हॅन (४१) असे या व्यापाऱ्याचे नाव असून तो मागील काही दिवसांपासून उमरेड येथील डी मर्सी हॉटेलमध्ये कमरा नंबर २०८ मध्ये मुक्कामी होता. या घटनेनंतर उमरेड पालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अन्य यंत्रणेची सोबत न मिळाल्याने चीन येथील या व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलमधील मुक्काम दुपारपर्यंत लांबला. अखेरीस मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पालिकेच्या आरोग्य विभागाने मोठ्या सतर्कतेने नागपूरच्या मेयो इस्पितळात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्याला रवाना केले.

त्याच्यासोबत हॉटेलमधील एका कर्मचाऱ्यासही पाठविण्यात आले आहे. हुआंग हॅन याचा पासपोर्ट क्रमांक ई४७०१२९४४ आहे. हॉटेल डी मर्सीने पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेला याबाबत कोणतीही सूचना दिली नाही, यावरून सर्वत्र टीकेची झोड उमटत आहे. हुआंग हॅन हा मिरचीचा व्यापार करण्यासाठी भारतात आल्याचे सांगत आहे. डिसेंबर २०१९ ला तो भारतात आल्याची बाब समोर येत असून या दरम्यान त्याने बºयाच ठिकाणी भारतभ्रमंतीसुद्धा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. केरळ राज्यातील कोची आणि दक्षिण भारतातील राची, नागपूर, उमरेड अशी प्रवासयात्रा हुआंग हॅन याने केली आहे. नागपूर येथील मँगो हॉटेल येथेही हॅन मुक्कामी होता, अशी माहिती त्याच्याकडून मिळाली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत यांनी त्याची विचारपूस तर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल सहारकर यांनी प्राथमिक आरोग्य तपासणी केली. हुआंग हॅनची प्रकृती बरी असली तरीही त्याची कोरोना संसर्ग चाचणी करणे महत्त्वाचे असून त्याला आम्ही नागपूरच्या मेयो रुग्णालयात विशेष तपासणीसाठी रवाना करीत आहोत, अशी माहिती राजेश भगत यांनी दिली. तपासणीअंती अहवाल आल्यानंतरच त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करावयाची की नाही याबाबतचा निर्णय होणार आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विलास काळे यांना विचारणा केली असता, हॉटेल डी मर्सीने २ मार्चला हॅन आल्याची बाब पोलीस ठाण्याला कळविली. त्यानंतर दुसऱ्यांदा १५ मार्चला आल्यानंतर काहीही कळविले नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी दिली. याप्रकरणी हॉटेलवर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले.दोनदा मुक्कामहॉटेल डी मर्सीला विचारणा केली असता, त्यांनी आधी दिनांक १५ मार्चपासून हुआंग हॅन असल्याचे सांगितले. पालिकेने नोंदणी बुकाची तपासणी केल्यावर तो या ठिकाणी २ मार्चलासुद्धा येऊन ११ मार्चला गेल्याचे दिसून आले. डिसेंबर २०१९ पासून मुक्कामी असलेल्या हॅनने बºयाचदा उमरेडला या हॉटेलमध्ये मुक्काम केला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.हॉटेलची लपवाछपवीसोमवारी पालिकेचे आरोग्य निरीक्षक दिलीप चव्हाण आणि विशाल नाईक यांना ही बाब कळताच त्यांनी संबंधित यंत्रणेला सतर्क करीत हॉटेल डी मर्सी गाठले. या ठिकाणी असलेल्या व्यक्तीकडे विचारणा केली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापक आणि हॉटेल मालक यांनाही विचारणा करण्यात आली. आज सकाळपासून पुन्हा विचारपूस सुरू झाली. हॉटेलमध्ये असलेल्या व्यक्तींपासून मालकापर्यंत साºयांनीच उडवाउडवीची उत्तरे दिली.हॉटेलवर कारवाई करासंपूर्ण जगभरात कोरोना संसर्गाबाबत अत्यंत काळजी घेतली जात आहे. विदेशी पाहुणे तसेच महानगरातून आलेल्यांबाबत पोलीस ठाणे अथवा आरोग्य विभागास कळवा, असा फतवा देशभरात काढण्यात आल्यानंतरही सदर डी मर्सी हॉटेलने कोणतीही सतर्कता बाळगल्याचे दिसून येत नाही. पोलीस ठाण्यात चिनी पाहुण्याबाबत माहितीसुद्धा देण्याचे काम हॉटेलच्या वतीने करण्यात आले नाही. हॉटेलच्या ‘सी’ फॉर्म आणि परवानगीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.बांगलादेशी पाच दिवसउमरेडच्या या डी मर्सी हॉटेलमध्ये बांगलादेश येथील नागरिकही दिनांक २ मार्च रोजी मुक्कामी होता, असे हॉटेलच्या नोंदणी बुकावरील नोंदीवरून लक्षात येत आहे. सदर बांगलादेशी कमरा क्रमांक २०९ मध्ये अर्थात चायनामॅनच्या खोलीलगतच पाच दिवस मुक्कामाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन